RTO Sangli: पासिंग साठी पैसे मागणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यापुढे तरुण झाला नग्न; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही जाल चक्रावून..
RTO Sangli: सर्वसामान्यांसह अनेकांना भ्रष्टाचाराला समोर जावं लागतं. सरकारी कामकाज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (corruption) आपल्या देशात होताना पाहायला मिळतो. सरकारी कामे करून घेण्यासाठी सर्वसामान्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक होताना पाहायला मिळते. साहजिकच यामुळे अनेकजण प्रचंड वैतागल्याचे देखील पाहायला मिळतं. मात्र कधीकधी हा संताप इतका अनावर होतो, की सरकारी अधिकार्यापुढे नक्की काय करावं? हे देखील सुचत नाही. अशीच एक घटना सांगलीच्या (Sangli) आरटीओ (RTO) ऑफिस समोर घडली आहे. ट्रॉली पासिंग (passing) करण्यासाठी पैसे मागणाऱ्या आरटीओ समोर एक तरुण चक्क अर्ध लग्न झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (viral) झाला आहे.
सांगली मधील कडेगाव (kade gaon) तालुक्यात आरटीओ ऑफिसमध्ये आपली ट्रॉली पासिंग करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा तरुण सामाजिक कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी पासिंग करण्यासाठी अधिकाऱ्याने दहा हजार रुपये लाच मागितल्याने हा प्रकार घडला. अधिकाऱ्यांनी दहा हजाराची मागणी केल्यानंतर तरुणाचा संताप अनावर झाला. माझ्याकडे पैसे नाहीत. मी मी भिकारी आहे, हे माझे कपडे घ्या, असं म्हणत, अंगावरचे जवळपास सर्व कपडे काढून आपला संताप व्यक्त करत टाहो फोडला.
तरुणाने अचानक आपल्या अंगावरचे कपडे काढल्याने समोर असणाऱ्या अधिकाऱ्याला काय करावं, हे सुचत नसल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. “तुझं काम करतो असं नको करू” अधिकारी असं म्हणताना देखील पाहायला मिळत आहे. तरुणाने अधिकाऱ्यांसमोर कपडे काढल्यानंतर, या कार्यालया मधील अनेक अधिकारी धावत आल्याचे देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. प्रमोद मांडवे Pramod mandve) असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव असून, या व्हिडिओची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पुढे या तरुणाने आरटीओ अधिकाऱ्यांचे हार घालून सत्कार करत जोरदार आंदोलन केलं.
प्रमोद मांडवे या तरुणाने लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याचा भांडाफोड केल्यानंतर, या तरुणांना अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, जीवन करकटे, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय माळी, आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव ओवाळ यासह अनेकांनी आरटीओ अधिकाऱ्याविरोधात घोषणाबाजी केली.
हे देखील वाचा Police Bharti 2022: राज्य सरकारकडून पोलीस भरतीचा जीआर जारी; या तारखेपासून 11 हजार 443 पदांची पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम