Police Bharti 2022: राज्य सरकारकडून पोलीस भरतीचा जीआर जारी; या तारखेपासून 11 हजार 443 पदांची पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू..

0

Police Bharti 2022: गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरती (police bharti) प्रक्रिये संदर्भातला अधिकृत जीआर नुकताच राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या जीआर नुसार, राज्यात तब्बल 11,443 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया राज्य सरकारकडून (Maharashtra government) राबविण्यात येणार असल्याने आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी पोलिस भरती होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या संदर्भात अधिकृत जीआर आला असल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा भरतीची तयारी सुरू केली आहे.

कोरोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे या काळात पोलीस भरती त्याचबरोबर इतर अनेक शासकीय भरती प्रक्रियेला देखील स्थगिती दिली होती. कोरोना संपून जवळपास एक-दीड वर्ष पूर्ण होऊन देखील राज्य सरकारने घेतलेला हाच निर्णय अमलात होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय माघार घेत शासन भरती करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. आज या भरती प्रक्रिया संदर्भातला जीआर देखील जारी करण्यात आला आहे. पोलीस शिपाई, त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक, आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशा तब्बल ११४४३ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

गेल्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरती प्रक्रिया संदर्भातला निर्णय घेण्यात आला. राज्यात एकूण रिक्त असणाऱ्या पदांपैकी 50 टक्के जागा भरण्यात येणार असून, या संदर्भात जीआर देखील जारी करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात गेल्या आठवड्यात घोषणा केली होती. त्यामध्ये साडेसात हजार पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता एकूण 11443 रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची माहिती जीआर द्वारे काढण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभाग सचिव, त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देखील दिल्याचं सांगितलं होतं.

सर्वप्रथम होणार मैदानी चाचणी

ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळावे, यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर-आर पाटील यांनी भरती प्रक्रियेच्या नियमात बदल केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या नियमात बदल करून पहिल्यांदा लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता पुन्हा एकदा या नियमात बदल झाला असून, सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार आहे. मात्र ही चाचणी 50 गुणांची होणार आहे. विशेष म्हणजे मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत, अशांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलीस भरती प्रक्रियेसाठी सर्वप्रथम घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीच्या एकूण 50 गुणांचे विश्लेषण करायचे झाल्यास, यामध्ये 1600 मीटर धावण्याला एकूण 20 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण मिळणार आहेत. त्याचबरोबर गोळा फेकसाठी 15 गुण, अशा पद्धतीने 50 गुणाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी उमेदवारांची एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. ज्यामध्ये पाच किमी धावणे 50 गुण देण्यात आले आहेत. 100 मीटरसाठी 25 गुण, गोळाफेक 25 गुण असणार आहेत.

लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण आवश्यक

जे उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, अशा उमेदवारांनाच लेखी परीक्षेला बसता येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागणार आहे. लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना किमान 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर उमेदवारांना 40 टक्के गुण पडले नाहीत, तर उमेदवार अपात्र ठरविण्यात येणार आहे. लेकित परीक्षा एकूण शंभर गुणांची आहे. शंभर गुणांचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना एकूण दीड तास वेळ असणार आहे. लेखी परीक्षेच्या एकूण शंभर गुणांचे वर्गीकरण करायचे झाल्यास, अंकगणित, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, या सोबतच मराठी व्याकरण अशा विषयांवर आधारित असणार आहे.

हे देखील वाचा Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

The Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.