Google Search: घरात कोणी नसल्यावर मुली Google वर सर्च करतात ‘या’ पाच गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Google Search: गूगल हे एक असं माध्यम आहे, ज्याच्याद्वारे कोणत्याही विषयाची माहिती आपल्याला क्षणात मिळते. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अनेक जण गुगलवर अनेक विषय सर्च करून त्याची माहिती घेतात. यामध्ये मुली देखील पाठीमागे नाहीत. मुली देखील गुगलवर त्यांना आवश्यक असणाऱ्या विषयांची माहिती घेत असतात. एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये पंधरा कोटी इंटरनेट युजर्स आहेत. त्यापैकी मुलींची संख्या ही ४० टक्के आहे. मुली एकट्या असताना गूगलवर काय सर्च करतात? हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया सविस्तर.
आपण गुगलवर काय सर्च करतो, याचा डाटा स्टोअर करून ठेवला जातो. मुली एकट्या असताना काय सर्च करतात याविषयीची माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. माणूस एकटा असल्यानंतर साहजिकच बोर होत असतो. अशा वेळात तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आता नवीन एखादी कल्पना सुचली की त्याच्यावर लगेच अंमलबजावणी करता येऊ शकते. मुलींना देखील एकट्या असताना वेगवेगळ्या कल्पना सुचतात. आता त्याची माहिती एका सर्वेतून समोर आली असून, मुली एकांतामध्ये असल्यावर जे काही सर्च करतात, हे वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल.
करीअरशी संबंधित गोष्टी करतात सर्च
एका सर्वेनुसार गुगलवर मुली एकांतामध्ये असताना आपल्या करिअर विषयी अधिक सर्च करत असल्याचं समोर आलं आहे. याबरोबरच कोणत्या करिअरमध्ये मुलींना जास्त संधी आहे, शिक्षण कोणतं घ्यावे? कोणतं कॉलेज उत्तम आहे? अशा अनेक करिअर संबंधीच्या गोष्टी मुली गुगलवर एकट्या असताना सर्च करत असल्याचं समोर आलं आहे.
ऑनलाइन शॉपिंग
मुलीं टापटीप आणि इतरांपेक्षा आपण नेहमी चांगले दिसावं याची काळजी घेत असतात. मुलींना शॉपिंगला बाहेर जाणं अनेकदा शक्य नसल्याने मुली शॉपिंगच्या अनेक ऑनलाईन वेबसाईट विषयी माहिती घेत असतात. त्याबरोबरच या वेबसाईटवर कोणते कपडे आपल्याला व्यवस्थित दिसतील, हे देखील एकट्या असताना तपासून पाहतात. या बरोबरच कोणत्या ऑनलाइन वेबसाईटवर अधिक डिस्काउंट कपडे खरेदीवर दिलं जातं, हे देखील मुली तपासून पाहतात.
सुंदर दिसण्यासाठी काय करावे
मुलींना नेहमी आपण इतरांपेक्षा सुंदर दिसावं, असं वाटत असतं. यात गैर देखील काही नाही. यासाठी मुली एकांतात घरी असताना आपला कलर आणखीन उजळण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? या विषयी देखील माहिती घेत असतात. यावबरोबरच वॅक्सिंग कसं केलं जातं? केसांची हेअर स्टाईल कशी चांगली दिसेल, याबाबत देखील मुली गुगलवर सर्च करतात. मुली गुगलवर सर्वाधिक आपल्या सौंदर्याबाबत सर्च करत असल्याचं या सर्वेतून समोर आलं आहे.
मुलांना काय आवडतं
अनेकदा मुलं देखील मुलींना कशी मुलं आवडतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कसं राहणं आवश्यक असतं, अशी माहिती एका सर्व्हेतून समोर आली होती. मुली देखील अशाच प्रकारचा टॉपिक Google वर सर्च करतात. मुलींमधील मुलांना काय आवडतं, हे देखील मुली एकट्या असताना सर्च करत असल्याचे समोर आले आहे. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र मुलांना कशा मुली आवडतात? हे देखील मुली गूगलवर सर्च करत असल्याचे समोर आले आहे.
शेरो शायरी आणि रोमँटिक गाणी
एकांतात असल्यावर मुली बऱ्याचदा रोमँटिक गाणी सर्च करत असल्याचे समोर आले आहे. एकांतात असल्यावर मुली रोमँटिक गाण्याचा आनंद घेतात. या रोमँटिक गाण्यांबरोबरच मुली शेरोशायरीची देखील माहिती मुली गुगलवर सर्च करत असल्याचं सर्व्हेतून समोर आले आहे. गुगलवर ही माहिती सर्च करत असणाऱ्या मुलींचे वय १९ ते २२ दरम्यान असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे.
हे देखील वाचा Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..
Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.