Indian Army NCC Recruitment 2022: भारतीय सैन्यात पदवीधरांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Indian Army NCC Recruitment 2022: बेरोजगारीच्या दुनियेत नोकरी मिळवणे अलीकडच्या काळात मोठे आव्हान आहे. बेरोजगारी बरोबरच महागाई देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साहजिकच अशा परिस्थितीत कुठेतरी चार पैशाची नोकरी करणे फार आवश्यक असते. मात्र अनेकदा नोकरी शोधूनही सापडत नसल्याचे पाहायला मिळते. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय सैन्यामध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत काही पदांसाठी भरती निघाली असून, या संदर्भात अधिक सूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर.

भारतीय सैन्यमध्ये एनसीसी स्पेशल इंट्री स्कीम अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेविषयी बोलायचं झालं तर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 55 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. आपण या भरती प्रक्रियेसंदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा? कोण कोणत्या पदासाठी भरती केली जाणार? त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार? उमेदवारांना वय आणि अटी? या संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ.

शैक्षणिक पात्रता आणि पद

भारतीय सैन्यामध्ये एनसीसी स्पेशल इंट्री स्कीम अंतर्गत 55 रिक्त पदांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आले आहे. आपण शैक्षणिक पात्रता डिटेल्समध्ये जाऊन घेऊ. NCC स्पेशल एंट्री(पुरुष) या पदासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांची कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून 50 टक्के गुणांसह पदवीधर शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबरोबरच एनसीसीमध्ये उमेदवारांनी किमान दोन वर्ष सेवा करणे देखील आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. त्याबरोबरच एनसीसी प्रमाणपत्र देखील उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

NCC स्पेशल एंट्री (महिला) या पदासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्राचा विचार करायचा असल्यास कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून उमेदवारांना 50 टक्केसह पदवीधर शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. महिलांसाठी एनसीसीमध्ये दोन वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक नसणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या वयाची काय अट ठेवण्यात आली आहे? हे देखील जाणून घेऊ.

वयाची अट आणि वेतन

भारतीय सैन्यामध्ये एनसीसी स्पेशल इंट्री स्कीम अंतर्गत 55 रिक्त पदांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांचा जन्म हा 1998 ते 2004 दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे. 1998 पूर्वी आणि 2004 नंतर उमेदवाराचा जन्म झालेला नसावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. या भरती अंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या पगाराविषयी जाऊन घ्यायचं झाल्यास, उमेदवारांना 56 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.joinindianarmy.nic.in असं सर्च करणे आवश्यक आहे. यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. ऑनलाइन अर्ज ओपन केल्यानंतर, तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला डायरेक्ट अर्ज करायचा असेल, तर तुम्ही यावर देखील क्लिक करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 देण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये संदर्भातली जाहीरात पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

हे देखील वाचा MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Second hand bike: 15, 22 आणि 28 हजारांच्या तीन Honda CB Shine विकल्या जात आहेत या ठिकाणी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.