WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..
WhatsApp Update: व्हाट्सअप हे भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप (messaging app) आहे. स्मार्टफोन (smartphone) असणाऱ्या प्रत्येकाकडे व्हाट्सअप आढळतेच. व्हाट्सअप (whatsapp) हे आता फक्त मेसेजिंग ॲप राहिले नसून, व्हाट्सअपच्या माध्यमातून आता व्हिडिओ कॉल, व्हिडिओ, फोटो, त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, देखील शेअर करता येतात. एकूणच काय तर व्हाट्सअप आता अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी, व्हाट्सअप हे धोकादायक देखील आहे. ग्रुपमधील एखाद्या सदस्याने जर आक्षेपार्ह मेसेज टाकला तर, ग्रुप ॲडमिनवर गु न्हा देखील दाखल होऊ शकतो. याची अनेक उदाहरणे देखील तुम्ही पाहिली असतील. मात्र आता या सगळ्यांची एडमिनला चिंता करण्याची आवश्यकता नाही. व्हाट्सअपने या संदर्भात एक नवीन फीचर्स आणले आहे. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
अनेकांकडे अनेक व्हाट्सअप ग्रुप असतात. काहींकडे आपल्या कुटुंबाचा व्हाट्सअप ग्रुप असतो. तर काहींकडे गावातील मंडळींचा व्हाट्सअप ग्रुप असतो. तर काहींकडे तालुक्याचा देखील व्हाट्सअप ग्रुप असल्याचं पाहायला मिळतं. पूर्वी व्हाट्सअपमध्ये 256 सदस्यांनाच ऍड करता येत होतं. मात्र व्हाट्सअपने यात बदल केले. आणि आता व्हाट्सअप ग्रुपमध्ये तब्बल 512 सदस्यांना ऍड करता येऊ लागलं आहे. ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच ग्रुप ॲडमिनवर देखील अधिक जबाबदारी आली आहे. ग्रुपमधील काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली असेल, तर पोस्ट करणाऱ्याबरोबर ॲडमिन देखील तितका जबाबदार असतो. हे आपल्या सगळ्याना माहिती आहे.
ग्रुपमधील एखाद्या सदस्याने जर आ क्षे पा र्ह पोस्ट टाकली तर त्याच्याबरोबर ॲडमिन देखील जबाबदार असतो, हे देखील खरं असलं तरी अनेकदा समोरचा सदस्य काय पोस्ट करेल, यावर ऍडमिनचं अजिबात नियंत्रण नसतं. सदस्याने जर आ क्षे पा र्ह पोस्ट टाकली, तर ऍडमिन त्याला ग्रुपमधून काढून टाकू शकतो. मात्र त्याने केलेला मेसेज मात्र तो तसाच राहतो. त्यामुळे अनेकदा दोन स मु दा यां म ध्ये मोठा वा द देखील होऊ शकतो. हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता एडमिनला याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. व्हाट्सअपने आता व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनला अधिक पावरफुल केलं आहे. खरंतर व्हाट्सअपने ग्रुप ॲडमिनला सुपर पावर दिली आहे, असंच म्हणावं लागेल.
जर तुम्ही एखाद्या व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. व्हाट्सअप आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फीचर्स उपलब्ध करताना पाहायला मिळतं. यावेळेस देखील व्हाट्सअप नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. WABetaInfo च्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपचे अॅडमिन असाल, आणि त्या ् व्हाट्सअप ग्रुपवर, ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने मेसेज केला, तरीदेखील त्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. म्हणजेच तो मेसेज एडमिनला डिलीट देखील करण्याची परवानगी व्हाट्सअप देत असल्याची माहिती आहे.
नवीन फिचर्स संदर्भात WABetaInfo ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. सध्या हे फीचर्स काही ठराविक ग्रुप ॲडमिन साठी प्रदान करण्यात आले आहे. मात्र लवकरच हे फिचर्स सर्व ग्रुप ॲडमिनसाठी लागू होणार आहेत. हे फिचर्स सध्या बिटा परीक्षकांसाठी उपलब्ध केले आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे फीचर सर्व ग्रुप ॲडमिनसाठी उपलब्ध केले जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
जर तुम्ही ही ग्रुप ॲडमिन असाल, आणि हे फीचर्स तुमच्यासाठी उपलब्ध केले गेले आहे, की नाही? हे पाहायचं असेल, तर तुम्ही ग्रुप मधील कोणत्याही सदस्यांनी पाठवलेल्या मेसेजवर सिलेक्ट करा. मेसेज सिलेक्ट केल्यानंतर, वरती तुम्हाला डिलीट हे चिन्ह पाहायला मिळेल. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, जर तुमच्यासमोर डिलीट ‘फॉर मी’ ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हे पर्याय पाहायला मिळाले, तर तुम्ही समजून जा हे पिक्चर तुमच्यासाठी देखील उपलब्ध केले आहे. या फीचर्समुळे आता एडमिनच्या डोक्याला होणारा ताप कमी होणार आहे. एखादा मेसेज जर वाद निर्माण करणारा असेल, तर ऍडमिन आता तो मेसेज सहज डिलीट करू शकतो.
व्हाट्सअप ग्रुप मधील सदस्यांवर यापूर्वी कोणाचेही नियंत्रण नसायचं. अनेकदा ग्रुप ॲडमिनने वार्निंग देऊन देखील ग्रुपमधील अनेक सदस्य ग्रुप ॲडमिनचे ऐकत नसायचे. मात्र आता ग्रुप मधील कोणत्याही सदस्याने आ क्षे पा र्ह संदेश सेंड केला असेल, तर तो डिलीट केला जाऊ शकतो. ग्रुप ॲडमिनला व्हाट्सअपने एकप्रकारे ही सुपर पॉवरच दिली आहे. सध्या हे फिचर्स फक्त ठराविक बीटा परीक्षकांकरीता आहे. मात्र हे फीचर्स काही दिवसांत सगळ्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.
हे देखील वाचा चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..
WhatsApp update: ही सोपी पद्धत वापरून WhatsApp वर Delete झालेला मेसेज येणार वाचता; जाणून घ्या ट्रिक..
MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..
MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.