Municipal Corporation Recruitment: दहावी, ग्रॅज्युएट उमेदवारांना पुणे महानगर पालिकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

0

Municipal Corporation Recruitment: देशात बेरोजगारीचा स्तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महागाई देखील प्रचंड वाढली आहे. गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेलच्या किंमती देखील सातत्याने वाढत चालल्या आहेत. साहजिकच यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे कमी की काम म्हणून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी देखील गमवावी लागली. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनेक विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.

उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने, आता अनेक तरुण उच्च शिक्षण घेत नाहीत. महागाईमुळे अनेकांचे कंबरड मोडल असल्याने आता अनेक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण दहावी बारावीनंतरच कुठेतरी नोकरी शोधताना दिसून येतात. उच्च शिक्षण न घेता कुठेतरी चार पैशाची नोकरी करणारा मोठा वर्ग सध्या पाहायला मिळतो. जर तुम्ही देखील दहावी आणि बारावी नंतर नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. पुणे महानगर पालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली असून, या संदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी तब्बल 444 रिक्त जागाची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अंतिम मुदत 10 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी www.pmc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. उमेदवारांचा शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पदवीधर उमेदवारांसाठी देखील ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर डिटेल्स आपण जाणून घेऊया.

या पदांसाठी केली जाणार भरती

पुणे महानगरपालिकाकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी एकूण ४४४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) लिपिक टंकलेखक, सहाय्यक विधी अधिकारी, या रिक्त पदांसाठी एकूण ४४४ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक या पदासाठी एकूण १०० जागा भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदासाठी पाच जागा भरण्यात येणार आहेत.

कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) या पदासाठी एकूण १३५ जागा भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लिपिक टंकलेखक या पदासाठी तब्बल २०० जागा भरण्यात येणार आहेत. तसेच सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी ४ रिक्त पदांची निवड करण्यात येणार आहे. कोण-कोणत्या पदासाठी किती जागा भरण्यात येणार आहेत, या विषयी आपण सविस्तर माहिती घेतली. मात्र आता या भरतीसाठी काय पात्रता ठेवण्यात आली आहे, याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ.

शैक्षणिक पात्रता

पुणे महानगरपालिकेकडून भरण्यात येणाऱ्या 444 जागांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास प्रत्येक पदाची वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकासाठी उमेदवार दहावी 50% गुणासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सव्हेअर किंवा ओव्हरसिअर ही पदवी असणे आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता(यांत्रीकी) या पदासाठी उमेदवारांला इंजिनिअर डिप्लोमा, त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव असणे देखील महत्वाचे आहे.

कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ही पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव देखील असणे बंधनकारक आहे. लिपिक टंकलेखक या पदासाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांची दहावी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांकडे एमएससीआयटी (MSCIT) सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. सोबतच मराठी इंग्लिश टायपिंग देखील अवगत असणे आवश्यक आहे. एका मिनिटात 30 मराठी शब्द टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे. तर इंग्रजी टायपिंग स्पीड ४० शब्द एका मिनिटात पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी उमेदवारांकडे विधी शाखेची पदवी, आणि पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत

पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवारांना वयाची देखील मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. कोणकोणत्या पदासाठी काय वयोमर्यादा आहे, हे थोडक्यात जाणून घेऊ. पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी सर्व पदांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास 18 ते 38 ही वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

असा करा अर्ज

पुणे महानगरपालिकेकडून भरण्यात येणाऱ्या 444 जागांसाठी उमेदवारांना पुणे महानगरपालिकेच्या अधीकृत ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम त्यांच्या मोबाइलमधील क्रोमवर जाऊन http://punecorporation.org/landing/mar.html असं सर्च करायचं आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही हे सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर पुणे महानगरपालिकेची वेबसाईट ओपन झालेली दिसेल.

त्यानंतर पहिल्याच पेजवर पदभरती २०२२ जाहिरात, शुद्दीपत्रक, आणि ‘अर्ज करा’ असे तीन पर्याय दिसतील. जर तुम्हाला या भरती संदर्भातली जाहिरात पाहायची असेल, तर तुम्हाला पहिल्या क्रमांकाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘अर्ज करा’ हा तिसरा पर्याय तुम्हाला याच पेजवर पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरती संदर्भातली सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. यानंतर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

WhatsApp update: ही सोपी पद्धत वापरून WhatsApp वर Delete झालेला मेसेज येणार वाचता; जाणून घ्या ट्रिक..

Shravan 2022: श्रावणात या पाच कारणांमुळे मांसाहार टाळलाच पाहीजे, अन्यथा होईल सत्यानाश..

Waterproof shoes: Amazon वर हे पाच Waterproof shoes विकले जातायत तब्बल निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.