Shravan 2022: श्रावणात ‘या’ पाच कारणांमुळे मांसाहार टाळलाच पाहीजे, अन्यथा होईल सत्यानाश..
Shravan 2022: भारतीय संस्कृतीत मांसाहार मोठ्या आवडीने केला जातो. शाकाहारापेक्षा मांसाहार खाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळते. ज्याप्रमाणे मैलागणीस माणसांची भाषा बदलते, त्याच प्रमाणे खाण्याच्या पद्धती देखील बदलतात. एवढं सगळं असलं तरी, भारतीय संस्कृतीत काही महिन्यांमध्ये मांसाहार करणे टाळतात. ज्यात श्रावण महिन्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. यावर्षी श्रावण महिना उद्यापासून सुरू होणार असून, तो २७ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. मात्र श्रावण महिन्यात मांसाहार का टाळतात? किंवा का टाळावा? याविषयीची शास्त्रीय कारणे तुम्हाला माहित आहेत का?
श्रावण महिन्यात शंभू महादेवाची पूजा केली जाते. शंकराला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात मांसाहार केला जात नाही. बऱ्यापैकी तुम्हाला मांसाहार न करण्याचे हेच कारण सांगितले जाईल. खरंतर हे झालं धार्मिक कारण. मात्र यापेक्षा आणखी एक महत्वाचे आणि शास्त्रीय कारण देखील आहे, आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यावेळेस श्रावण महिन्यातील सोमवारांविषयी जाणून घ्यायचं झाल्यास, एक तारखेला श्रावनातला पहिला सोमवार येत आहे. दुसरा सोमवार ८ तारखेला, तिसरा १५ तारखेला तर चौथा श्रावणी सोमवार हा २२ तारखेला येत आहे. या चार श्रावणी सोमवारी अनेकजण शंभू महादेवाचे उपवास ठेवतात.
श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार करण्यापासून लांब राहतात. घरातील मोठी माणसे देखील या महिन्यात मांसाहारापासून लांब रहा असा सल्ला देतात. अनेकजण कशाचाही विचार न करता या महिन्यात मांसाहार करणे टाळतात. अनेकांना वाटतं, यात फक्त धार्मिक कारणच आहे, मात्र धार्मिक बरोबर याला शास्त्रीय कारण देखील आहे. या महिन्यात मांसाहार केल्यास याचे गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावर होतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. जाणून घेऊया सविस्तर.
अपचन
या महिन्यात पाऊसाचे प्रमाण अधिक असते. साहजिकच दररोजच्या पावसामुळे हवामानात देखील आद्रता पाहायला मिळते. या वातावरणाचा आपल्या पचनसंस्थेवर मोठा परिणाम होतो. पचनसंस्था कमजोर होते. अशा वातावरणामध्ये नेहमी शाकाहारी आणि हलकं जेवण करून आवश्यक असल्याचं तज्ञांचे मत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, शाकाहारी जेवण हे मांसाहारी जेवणापेक्षा पचायला अधिक सोयीस्कर आहे. पावसाळी वातावरणामध्ये पचनशक्ती कमकुवत होते, सहाजिकच यामुळे मांसाहारी जेवण हे आतड्यांमध्ये सडले जाते. आणि म्हणून आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ नये, म्हणून श्रावण महिन्यात मांसाहार करणं टाळलं जातं.
अन्नपदार्थ खराब होतात.
श्रावण महिना हा पावसाळा ऋतूमध्ये येतो पाऊस देखील श्रावण महिन्यात जोरदार बरसतो. पावसाळ्यातील इतर महिन्यांच्या तुलनेत श्रावण महिन्यात पाऊस हा अधिक असतो. या महिन्यांत दिवसभर अनेकदा ऊन देखील पडत नसल्याचे पाहायला मिळतं. साहजिकच या वातावरणामुळे अन्नपदार्थांवर बुरशीचे संक्रमण पाहायला मिळते. इतर शाकाहारी अन्नपदार्थांच्या तुलनेत मांसाहारावर या वातावरणाचा अधिक परिणाम होतो. या वातावरणात सूर्यप्रकाशाची कमतरता असल्यामुळे मांसाहार अधिक खराब होतो. आणि म्हणून श्रावण महिन्यांत मांसाहार करू नये, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतं, असा सल्ला दिला जातो.
या वातावरणात प्राणी देखील पडतात आजारी
इतर सगळ्या ऋतूंमध्ये पावसाळा हा आरोग्यासाठी खूप धोकादायक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये माणसांबरोबर इतर प्राणी देखील आजारी पडण्याचं मोठं प्रमाण पाहायला मिळतं. या वातावरणामध्ये सतत नेहमी पाऊस पडत राहिल्याने, कीटकांची संख्या वाढते. प्राणी नेहमी तृणधान्य खात असतात. पावसाळ्यामध्ये तृणधान्यावर कीटक पडल्याने साहजिकच प्राणी कीटक देखील खातात, याचा परिणाम म्हणून प्राणी आजारी पडतात. प्राणी आजारी पडल्याने साहजिकच आपण मांसाहार केल्यानंतर, प्राण्यांचा संसर्ग आपल्यापर्यंत देखील पोहोचण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणे टाळणं आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.
श्रावण महिन्यात मासे अंडी देतात.
मांसाहारामध्ये मासा हा प्रकार देखील मोठ्या संख्येने खाल्ला जातो. मात्र या महिन्यात शक्यतो मासे खाणं टाळणे आवश्यक आहे. कारण मासे श्रावण महिन्यात अंडी घालतात. साहजिकच यामुळे हार्मोनल मोठ्या प्रमाणात तयार होत असते. आणि म्हणून जर आपण या काळात मासे खाल्ले, तर आपल्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होतात. याशिवाय या काळात अनेक मासे आपल्या अंड्याच्या माध्यमातून पिलांना जन्म घालत असतात. आणि म्हणून या काळात आपण मासे खाल्ल्याने त्यांचे नवजीव नाहीसे होऊ शकते. हे देखील एक महत्वाचे कारण आहे.
पचणारे अन्न खाणे आवश्यक
उशिरा पचणाऱ्यांना अन्नाचे सेवन करणे हे आरोग्यासाठी खूप धोकादायक असते. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात पचनक्रिया व्यवस्थित राहत नसल्याने, या काळात नेहमी शाकाहारी आणि हलकं जेवण करणं आवश्यक असतं. मांसाहार शाकाहाराच्या तुलनेत अधिक जड असतं. साहजिकच ते पचायला अधिक जड जात असल्याने, आपल्या पोटात हे अन्न जास्त काळ राहतं. आणि आपल्या पोटामध्ये हे अन्न जास्त काळ राहिल्याने, आतडे सडण्याची प्रक्रिया देखील सुरू होते. आणि म्हणून, या काळात नेहमी शाकाहारी आणि हलकं जेवण करणं आवश्यक असतं.
हे देखील वाचा Marriage tips: या पाच गोष्टींतून महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात या गोष्टी..
Waterproof shoes: Amazon वर हे पाच Waterproof shoes विकले जातायत तब्बल निम्म्या किंमतीत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम