PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; ‘अशी’ चेक करा यादी..
PM kisan Update: पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या अकराव्या हप्त्याची वाट लाभार्थी शेतकरी पाहत आहोत.(PM Kisan 11th Installment Update) आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आता केंद्र सरकारने अकराव्या हप्त्याच्या नियमात बदल केल्यामुळे, अकराव्या हप्त्याची लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पीएम किसान (PM kisan) लाभार्थी शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते (bank account) आधारशी aadhaar card) लिंक असणे बंधनकारक केले आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर अकरावा हप्ता येण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. List for PM Kisan 11th Installment released, check you name)
पीएम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर 11वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. अकरावा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशा शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता जमा होणार आहे, अशा शेतकऱ्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत तुमचे नाव तपासायचे असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरणार आहे. सरकारने जारी केलेल्या यादीत आपले नाव आले आहे की, नाही हे कसे तपासायचे? हे आता आपण सोप्या भाषेत पाहूया.
या सोप्या पद्धतीने तपासा तुमचे नाव
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या द्यावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in. असं सर्च करावे लागणार आहे. https://pmkisan.gov.in. असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पीएम किसानची अधिकृत वेबसाइट ओपन झालेली असेल. आता तुम्हाला या वेबसाईटच्या होमपेजवर ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथपर्यंत व्यवस्तीत प्रोसेस केल्यानंतर, तुमच्या समोर शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल, त्यात तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागणार आहे. या यादीवर क्लिक केल्यानंतर, ड्रॉप डाउन सूची हे नवीन पेज ओपन झालेलं दिसेल, आता तुम्हाला या पेजवर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडायचं आहे. यानंतर तुम्हाला समोर, दिसणाऱ्या ‘Get Report’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर, तुमच्या सामोरं लाभार्थ्यांची यादी दिसणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासता येणार आहे.
या सोप्या पद्धतीने हप्त्याची स्थिती तपासा
जर तुम्ही पाहिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला अकराव्या हप्त्याची स्थिती देखील तपासता येणार आहे. यासंदर्भातली देखील आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देत आहोत.
जर तुम्हालाहप्त्याची स्थिती तपासायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर, तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक करायचं आहे. फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक केल्यानंर, तुमच्या समोर नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. या पेजवर तुम्हाला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, टाकावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांना अकरावा हप्ता या महिन्याच्या अखेपर्यंत जमा होणार असल्याची माहिती आहे.
११ व्या हप्त्यासाठी e-kyc बंधनकारक
आतापर्यंत PM kisan योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण दहा हप्ते मिळाले आहेत. तर अकरावा हप्ता मिळवण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी e-kyc केली नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्हाला e-kyc करायची असेल तर तुम्ही यावर क्लिक करा करा
Dharmaveer Movie Review: आनंद दिघेंना जिवंत करणारा धर्मवीर
आपल्या नवऱ्याला जी वे मा रण्यासाठी पत्नीनेच रचला डाव, शेवटी असा झाला उलगडा..
Ration Card: आता या लोकांचे रेशन काrd hoणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम