Lifestyle: नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने जुन्या बॉयफ्रेंड सोबत..,” वरून म्हणतेय असं करणं योग्य..

0

Lifestyle: आयुष्य जगत असताना तुम्हाला अनेक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. माणूस हा नेहमी अनुकरून करून जगत असतो. आपल्या आसपास सभोवताली अनेक चांगल्या गोष्टींचे अनुकरण करत असतो, तर आसपास घडणाऱ्या वाईट गोष्टींमधून अनुभव घेतो, आणि त्या वाटेला जायच्या नादी लागत नाही. आयुष्य जगत असताना तुम्हाला याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तरच तुम्ही एक उत्तम आयुष्य जगू शकता. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. खरं तर ही एक विवाहित महिलेची कहाणी आहे. तीने स्वतः आपली ही व्यथा एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाला शेअर केली आहे. जाणून घेऊया ही कहाणी काय आहे.

मी एक विवाहित महिला असून, माझ्या पतीवर माझे खूप प्रेम आहे. परंतु लग्नानंतर काही महिन्यांनी ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. आता मला माझे लग्न कंटाळवाणी वाटू लागले आहे. याचे कारण म्हणजे माझा नवरा मला वेळ देत नाही. माझा नवरा कामामुळे नेहमी व्यस्त असतो, आणि यामुळे आम्हा दोघांना एकत्र टाईम स्पेंड करता येत नाही. त्याच्या या सवयीमुळे मी एकटी एकटी पडले आहे, आणि अशात माझ्याकडून मोठी चूक झाली.

माझा नवरा मला वेळ देत नसल्याने, मी एकटी पडली. आणि यामुळे मी माझ्या जुन्या बॉयफ्रेंड सोबत रिलेशनशिपमध्ये देखील आली. विशेष म्हणजे माझा बॉयफ्रेंड आजही माझ्यावर पूर्वीसारखाच खूप प्रेम करतो. मला नेहमी सपोर्ट करतो. मला हवा तेवढा वेळ देखील तो असल्याने, मी त्याच्या सोबत खूप खूष राहते. त्याच्या सोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं. मात्र या एका कारणामुळे मी माझं लग्न देखील मोडू ईच्छीत नाही.

जरी मला माझ्या बॉयफ्रेंड सोबत वेळ घालवायला आवडत असला, हवा तेवढा वेळ देत असला तरीदेखील मला माझ्या नवऱ्यासोबतचे संबंध तोडायचे नाहीच, मला माझा संसार करायचा आहे. मला याची कल्पना आहे, माझं लग्न झालं असल्याने मी आता पुन्हा जुन्या बॉयफ्रेंड सोबत रिलेशनशिपमध्ये येणं योग्य नाही. मात्र यातून बाहेर पडणं देखील मला आता अवघड वाटू लागलं आहे. मला सगळ्यात जास्त मी माझ्या पतीशी खोटे बोलत आहे, याचा माझा मलाच तिरस्कार येऊ लागला आहे. मी काय करावं?

उत्तर; मनोचिकित्सक-प्रशिक्षक आणि गेटवे ऑफ हीलिंगच्या संस्थापक-संचालक याविषयी सांगतात, ही सगळी परिस्थिती तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आहे, याची मला कल्पना आहे. जर तुम्हाला संसार करायचा असेल, आणि तुमच्या पतीसोबत तुम्हाला राहायचं असेल तर, तुम्ही हे नातं जोडणं अधिक चांगलं होईल. मात्र हे करत असताना तुम्ही या विषयी तुमच्या पतीशी बोललं गरजेचं आहे.

कदाचित आपल्या कामाचा आणि आपल्या व्यस्त राहण्याचा त्रास आपल्या पत्नीला सहन करावा लागत आहे, याची कल्पना तुमच्या पतिला नसेल. आपल्या पतीसोबत तुम्हाला वेळ घालवायचा, आहे हे तुमच्यासाठी खुप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही तुमच्या पतीला समजावून सांगणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे तुम्ही तुमच्या जुन्या बॉयफ्रेंडला देखील मी पतीसोबत अजूनही वचनबद्ध आहे, असे सांगणं आवश्यक आहे. जेणेकरून त्याच्या मनात काय आहे हे देखील तुम्हाला समजेल.

तुमचा एक्स बॉयफ्रेंड जर तुमचा वापर करत असेल, तर त्याच्या सोबत तुम्ही मैत्री देखील ठेवणं उचित राहणार नाही. तुम्ही या प्रकरणाशी तुमच्या पतीशी बोलल्यानंतर तुमच्या पतीचा काय महत्वाचं आहे. या गोष्टीची जर तुम्ही तक्रार केली, आणि तुमचा पती स्वतःमध्ये बदल करण्यास तयार होत असेल, तर तुम्ही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आणि तुमच्या एक्स सोबत असणारे सर्व संबंध तोडणे देखील योग्य राहिल.

तुम्ही या प्रकरणावर तुमच्या पतीशी खुलेपणाने बोलल्यानंतर, तुमच्या पतीने मला थोडा वेळ दे, नंतर आपण एकमेकांसोबत व्यवस्थित राहूया. अशी विनवणी केली केली. तरीदेखील तुम्ही त्याला सहमती दर्शवा. मात्र जर तो पूर्वीसारखाच तुमच्याशी वागत असेल तर, तुम्ही विवाह सल्लागाराची मदत घेऊ शकता.

हे देखील वाचा PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

Air India AIASL Recruitment 2022: टाटा समुहाच्या एअर इंडियात विविध पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..

सामग्री क्रेडिट: TOI, इंग्रजीत वाचण्यासाठी यावर क्लिक करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.