Navneet Rana: धक्कादायक! ‘या’ कारणामुळे नवनीत राणांना पोलीसांनी बाथरूमलाही जाऊ दिले नाही..

0

Navneet Rana: हनुमान चालीसा वरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटल्याने, राज्याचे राजकारण ढवळून निघाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे खार पोलिसांनी  नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. ‘प्रक्षोभक’ विधाने करत कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यामुळे खार पोलिसांनी (Khar police) राणा दांपत्यावर ही कारवाई केली.

काल सकाळी खार पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर, खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर पोलिसांची हुज्जत घातली म्हणून,सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला.

२३ तारखेला खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना अटक केल्यानंतर, २३  तारखेची रात्र खार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांना काढावी लागली. मात्र आता खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. खार पोलिसांनी मला अत्यंत हीन वागणूक दिल्याचं त्यांनी लोकसभा अध्यक्षाना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. रात्रभर मला पाणीदेखील प्यायला दिलं नाही, बाथरूमला देखील जाऊ दिले नाही. असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पोलीसांवर केला आहे.

विशेष म्हणजे, नवनीत राणा यांनी पोलिसांवर आरोप करताना बाथरूमला न जाण्याचा आणि पाणी न देण्याचं धक्कादायक कारणही सांगितलं आहे. अनुसुचित जातीची असल्यामुळे आमच्या भांड्यात तुला पाणी मिळणार नसल्याचं, त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातीची तू असल्यामुळे आमचं बाथरूम देखील वापरू शकत नाहीस, असा गंभीर आरोप खार पोलिसांवर नवनीत राणा यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे आता नवीन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनीत राणा यांनी या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील लिहिले असून, आपल्याला न्याय हवा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करताना पोलिसांवर आणि सरकारवर जोरदार ह ल्ला चढवला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मशिदीवरील भोंगे या प्रकरणी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिलं होतं. मात्र या बैठकीला देवेंद्र फडणवीसांनी अनुपस्थिती नोंदवली‌. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार ह ल्ला चढवला. या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य करताना देवेंद्र फडणीस यांनी नवनीत राणा यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये मिळालेल्या हीन वागणूकी विषयी देखील भाष्य केलं.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात जे सुरू आहे, हे सर्व मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर सुरू आहे. राज्यात ठोकशाही मार्गाने राज्य सुरू आहे. सरकार विरोधात जो बोलेल त्याला अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकलं जातंय. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतोय. हनुमान चालीसा म्हणणं, हा जर राजद्रोहाचा गुन्हा असेल, तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करायला तयार आहे.

मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

खार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांविषयी राणा दाम्पत्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. दरम्यान सत्र न्यायालयाने यापूर्वीच राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, राणा दाम्पत्यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर 29 तारखेला सुनावणी होणार आहे.

कोर्टाने राणा दाम्पत्यांना झापलं

लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावं असं आम्ही वारंवार सांगून देखील, लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधींकडून यासंदर्भात काही अपेक्षा करणं चुकीचं असल्याचं म्हणत, फटकारलं.

हे देखील वाचा Navneet Rana: ठाकरे सरकारचा दणका! राणा दाम्पत्याना होणार तीन वर्षांची शिक्षा..

“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा म्हणजे.., पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, पोलिसच अडचणीत

Lifestyle: ‘या’चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून.. 

Amazon prime: आता Hotstar, Netflix-Amazon prime सबस्क्रिप्शन न करता मोफत पाहता येणार; फक्त करा हे काम..

Viral video: मुलीच्या डोक्यात साप शिरल्याने उडाला गोंधळ; मुलगीही न घाबरता सापाला काढू लागली बाहेर पण..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.