Amazon prime: आता Hotstar, Netflix-Amazon prime सबस्क्रिप्शन न करता मोफत पाहता येणार; फक्त करा ‘हे’ काम..
Amazon prime: अलीकडच्या काळात ओटीटी वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे पाहायला मिळते. मात्र ओटीटीचे सबस्क्रिप्शन अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अजूनही अनेकजण या पासून वंचित असल्याचे पाहायला मिळते. मात्र आता अमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
सुरवातीला रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तब्बल एक वर्ष मोफत डाटा आणि कॉलिंग दिल्याने या टेलिकॉम कंपनीचे असंख्य वापरकर्ते झाले. जियो आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असते. आता देखील जिओने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त जिओ पोस्टपेड प्लॅन्स मार्केटमध्ये उतरविले आहेत.
जर तुम्ही जिओ पोस्टपेडचे वापरकर्ते असाल आणि सोबतच तुम्ही ओटीटीचे देखील युजर्स असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल एका वर्षासाठी OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे यात तुम्हाला Hotstar, Netflix तसेच Amazon Prime Video या तिन्ही OTT अॅप्सचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅन विषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया..
Jio चा 599 रुपयांचा प्लॅन आहे सर्वोत्तम
जर तुम्ही OTT प्लॅटफॉर्मचे युजर्स असला ,तर हा प्लॅन तुमच्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. Jio च्या 599 रिचार्जमध्ये तुम्हाला 100 जीबी हाय स्पीड डाटा मिळतो. या सोबतच, तुम्हाला अनलिमिटेड व्हाईस कॉल देखील मिळतो. याशिवाय तुम्ही दररोज शंभर एसएमएसचा देखील लाभ घेऊ शकता. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला वर्षभरासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सर्व ॲप्सची सुविधा मोफत घेता येणार आहे.
जिओचा 399 रुपयांचा रिचार्जही आहे खास
जिओच्या 399 रुपयांच्या रिचार्ज मध्ये देखील तुम्हाला 75 जीबी हाय स्पीड डाटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस करण्याची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सर्व ॲप्सचा आनंद मोफत घेता येणार आहे. आता आपण जिओच्या या दोन प्लॅनचे आणखी काय फायदा आहेत, ते जाणून घेऊया..
इतर कोणते फायदे?
आपण पाहिलेल्या वरील दोन प्लॅनवर जिओ कंपनी आपल्या जिओ प्लॅनसह तब्बल 1 वर्षासाठी Disney + Hotstar, Amazon Prime Video, Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ देत आहे. सोबतच तुम्हाला Jio Tv, Jio Cinema बरोबरच Jio अॅप्सचा देखील मोफत लाभ घेता येणार आहे.
आपण पाहतो अमेझॉन प्राईम व्हिडिओ नेटफ्लिक्स यासारख्या प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यासाठी वर्षाला दीड ते 2000 रुपये खर्च करावे लागतात. मात्र जिओच्या हा प्लॅन तुम्ही केला, तर तुम्हाला Disney + Hotstar, Amazon Prime Video, Netflix यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.
हे देखील वाचा Viral video: शिकार करायला टपलेल्या सिंहीणीला म्हशीने शिंगावर घेऊन अनेकवेळा चेंडूसारखं फेकून दिलंय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम