NPC Recruitment 2022: बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर..

0

NPC Recruitment 2022 : बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीच्या या दुनियेत रोजगार मिळवणं ही मोठी कसरत असते. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी म्हटलं तर, मग बोलायलाच नको. आपलं निम्मं आयुष्य खर्ची घातले तरी, सरकारी नोकरी मिळेल की नाही याविषयी शंका असते. त्यात कोरोनाने अनेकांचा रोजगार हिरावून घेतला. त्यामुळे सहाजिकच बेरोजगारांचा मोठा वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.  मात्र जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, आणि सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

बारावी आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता महत्वाची बातमी असून, आता तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने (National Productivity Council) आता एक अधिसूचना जारी करून संदर्भात माहिती दिली आहे. या सरकारी संस्थेमार्फत  सपोर्ट एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांची भरती करण्यात येणार असल्याची अधिसूचना आपल्या अधिकृत वेबसाइटवरून जारी करण्यात आली आहे.

बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देता येणार असून, इच्छुक उमेदवारांनी 26 एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक असणार आहे. अॉनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी राष्ट्रीय उत्पादकता परिषदेच्या  npcindia.gov.in या  अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या भरतीच्या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.

कोणत्या पदांसाठी किती पदे आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊया…

या भरती प्रक्रियेसाठी सपोर्ट एक्झिक्युटिव्हची 3 पदे असणार आहेत, तसेच टेक्निकल एक्झिक्युटिव्हचे एक पद असणार आहे. लीगल एक्झिक्युटिव्हचे देखील एकच पद असणार आहे. तसेच वरिष्ठ सल्लागाराची दोन पदे असणार आहे. अशा एकूण या भरतीसाठी ३९ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

आता आपण या भरतीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचे काय निकष आहेत, हे सविस्तर जाणून घेऊया….
या भरती बाबद काढलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारानं कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कुठल्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना आता या भरती अंतर्गत मिळणारे वेतन पाहूया…
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना २५ ते ५० हजार दरम्यान वेतन मिळणार आहे.  या भरतीचा अॉनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२२ आहे.

या भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाणार हे पाहूया..

राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांची होणारी निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या भरतीविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही या वेबसाईटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी यावर क्लिक करा आणि पहा अधिसूचना.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Adani Wilmar Upper Circuit: Adani Wilmar चा शेयर दोन महिन्यांत वाढला तिप्पट; आता गुंतवणूक करायची की नाही? जाणून घ्या सविस्तर..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Viral Video: या कारणामुळे वधूने भर मंडपात मारली वरच्या कानाखाली; पुढे काय झालं? पहा व्हायरल व्हिडीओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.