Lemon: लिंबांना सफरचंद एवढा भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांची झोळी मात्र फाटकीच; जाणून घ्या यामागचं गणित..

0

Lemon: गेल्या आठवड्यापासून लिंबांच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लिंबांनी उच्चांक गाठला असून, किंमती गगनाला भिडल्या आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात लिंबांना एवढा दर कधीही मिळाला नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. तब्बल अडीचशे रुपये किलो दराप्रमाणे लिंबूू (lemon) विकली जात असली तरी, शेतकऱ्यांची झोळी मात्र फाटलेलीच आहे. लिंबांना सध्या सफरचंद (Apple) एवढा भाव मिळत असला तरी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मात्र वाढ झाली नाही, नक्की यामागचे गणित काय आहे, आपण सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्रासह देशभरात लिंबाने उच्चांक गाठला आहे. उत्तर प्रदेश मधील गाजियाबादमध्ये तर लिंबू तब्बल ३०० रुपये किलोने विकली जात आहेत. गुजरात तेलंगणा, महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील लिंबू विक्रमी किंमतीने विकली जात आहेत. तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे अनेकांचा थंडपेय पिण्याकडे कल वाढला. सर्वसामान्यांचे लिंबू सरबत हे सर्वात आवडते थंड पेय होते. मात्र लिंबाच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने, सर्वसामान्यांची लिंबू पाणी देखील आता पिण्याची ऐपत राहिली नाही.

सर्वप्रथम आपण लिंबाचं उत्पादन कसे होते हे पाहूया..

लिंबाच्या झाडाला वर्षातून अंबे बहर, मृग बहर, हस्ता बहर अशा प्रकारचा तीनवेळा बहर येत असतो. अंबे बहरात साधारण फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. तर एप्रिलमध्ये लिंबं तोडायला येतात. तसेच मृग बहरात जुलैमध्ये फुलं येऊन ऑक्टोबर दरम्यान लिंबू लागतं. हस्ता बहरात ऑक्टोबरमध्ये फुलं येत असतात. वर्षातून तीनदा बहर येत असल्याने शेतकऱ्यांना कमी दराने लिंबु विकलं गेलं, तरी देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं.

किती आहेत लिंबाच्या किंमती?

पुणे तसेच सोलापुरातील घाऊक बाजारपेठांमध्ये दोनशे रुपयाच्या आसपास या दराप्रमाणे लिंबू विकले जात आहे. किरकोळ बाजारपेठेत दराचा विचार केला तर, एक लिंबू साधारण पंधरा ते वीस रुपयाला पुण्यात आणि सोलापूरमध्ये देखील विकलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लिंबाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली मात्र पुरवठा खूप कमी प्रमाणात होत आहे‌. आणि म्हणून या किंमती गगनाला भिडल्या असल्याचे येथील व्यापारी सांगतात. मार्चमध्ये लिंबाच्या दराचा विचार करायचा झाल्यास, शंभर रुपये किलोच्या आसपास लिंबं विकली जात होती.

लिंबाच्या किंमती कशामुळे वाढल्या?

लिंबाच्या झाडांना वर्षातून तीनदा लागणाऱ्या तिनही बहरावर वातावरणाचा खूप मोठा परिणाम झाला. वातावरणात सतत झालेले बदल, आणि मागच्या वर्षी मान्सून बरोबर ऑक्टोंबरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस, तसेच मोठ्या प्रमाणात पडलेले धुकं, आणि आता तापमानात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे लिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. सहाजिकच त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन देखील, उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. जसं की आपल्याला माहिती आहे, लिंबाचे झाडं ही खूपच नाजूक असतात. सहाजिकच या सगळ्या वातावरणाचा परिणाम झाडांवर झाला.

अंबे बहरमधून निघणाऱ्या उत्पादनावर देखील अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला. यामुळे फेब्रुवारीमध्ये फुलं धरण्याच्या प्रमाणात मोठी घसरण झाली. तसेच मार्चपासूनच विक्रमी झालेल्या तापमान वाढीचा देखील मोठा परिणाम फुलांच्या वाढीवर झाला. साहजिकच त्यामुळे लिंबाच्या उत्पन्नात घट झाली. तापमान अधिक वाढल्याने लिबांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. तर दुसरीकडे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली, आणि याचा परिणाम लिंबाच्या किमतींवर झाला.

लिंबाचे दर विक्रमी होऊन देखील शेतकऱ्यांची झोळी रिकामीच का?

गेल्यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, वातावरणात झालेले सतत बदल, अचानक पडलेलं धुकं, यामुळे शेतकर्‍यांच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. वातावरणात झालेले सतत बदल, अवकाळी पाऊस यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पडला. अनेक औषध फवारणी करून उत्पादन खर्च वाढला, मात्र उत्पन्नात वाढ झाली नाही. यात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे.

अवकाळी पाऊस, वातावरणात झालेले सतत बदल, अचानक पडलेलं धुकं आणि आता मार्चमध्येच तापमानाने गाठलेला उच्चांक यामुळे लिंबाच्या झाडावर मोठा परिणाम झाला. आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट झाल्याने लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी, दरवर्षीसरखं उत्पन्न मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लिंबाचे दर सफरचंदाएवढे वाढून देखील, शेतकऱ्यांची झोळी फाटलेलीच असल्याचं म्हणावं लागत आहे.

दर कधी कमी होणार?

लिंबाच्या किमती काही लवकर कमी होणार नसल्याचं आता तज्ञांकडून बोलण्यात येत आहे. बाजारपेठांमध्ये लिंबाचा तुटवडा निर्माण होत आहे. मागणीनुसार लिंबाचा पुरवठा होत नसल्याने, दर कमी होत नसल्याचे बोलले जात आहे. बाजारपेठांमध्ये आता लिंबांचा पुरवठा आक्टोंबरमध्येच होणार असल्याचं बोललं जात आहे. ऑक्टोंबरमध्ये जर लिंबाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला, तर मग तेव्हाच लिंबाचा किंमती उतरणार असल्याचं सांगितलं जातंय.

हे देखील वाचा वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल; पिकांची कशी राखाल निगा, जाणून घ्या सविस्तर..

या धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसं लुटतंय, वाचा सविस्तर

Viral video; लँडिंग होताना विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; व्हिडिओ पाहून होईल काळजाचं पाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.