Video: ग्रामपंचायतीचा अजब कारभार! पाणी असूनही पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही; वयोवृद्ध महिलांचा पाण्यासाठी टाहो..
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचीही पाण्यासाठी वणवण..
माळशिरस प्रतिनिधी: माळशिरस (malshiras) तालुक्यातील पिंपरी (pimpri) या गावामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत पिंपरीने पाणीपुरवठा केला नसल्याचा, धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हंडाभर पाण्यासाठी वयोवृद्ध महिलांनी आक्रोश करत, आमच्यावर दया करा अशी प्रशासनाला भावनिक साद घातली. आणि पाण्यासाठी टाहो फोडला. ही घटना पिंपरीतील शिंदेवस्ती भागात घडली असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तापमानाने उच्चांक गाठला असल्याने, आता उन्हाबरोबरच पाण्याचेही चटके बसू लागले आहेत. मात्र पाणी असताना देखील माळशिरस तालुक्यातील, पिंपरी गावातील ‘पिंपरी ग्रामपंचायती’ने गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना पाणीपुरवठा केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने, आता गावातील नागरिक संतापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गावातील शिंदेवस्ती भागातील काही महिलांनी हातामध्ये हंडा घेऊन, ‘ग्रामपंचायत टाकी’पाशी ‘टाहो’ फोडला. यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या वयोवृद्ध महिलांचा आक्रोश आणि हतबलता पाहून, उपस्थित अनेक नागरिकांचे डोळे पानवल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे शासनाने 15 व्या वित्तआयोगानुसार देण्यात आलेल्या निधीपैकी, 50 टक्के निधी हा पाण्यावर खर्च करायला सांगितला आहे. मात्र तरी देखील, नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही, ही मोठी शोकांतिका असून, हा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार असल्याचंही नागरिकांनी म्हटलं.
या भागातील ग्रामपंचायत सदस्य ‘गणेश गेंड’ या संदर्भात बोलताना म्हणाले, ,”जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, नागरिकांना पाण्याची अधिक आवश्यकता आहे. सरपंच, (sarpanch) ग्रामसेवक (gramsevak) यांना वारंवार विचारणा, तक्रार करून देखील त्यांनी या घटनेकडे सपशेल दुर्लक्ष केलंय. ‘पाणीपुरवठा विहिरी’मध्ये पाणी असून देखील, लाईट नसल्याचं कारण सांगितलं जातंय, हे खूप दुर्दैवी आहे. यासंदर्भात ग्रामसेवकांना अनेक वेळा फोन केला, मात्र फोन उचलण्याऐवजी बंद करून ठेवण्यात येतोय”
ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याची समस्या, ही गेल्या अनेक महिन्यांपासूनची आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कधीही सुरळीत झाला नाही. मात्र पाऊस ठीक-ठाक पडल्यामुळे पाण्याची समस्या फारशी जाणवली नाही. मात्र आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने, पाण्याची अधिक गरज भासू लागली आहे. आसपासच्या विहिरींना पाणी नसल्यामुळे, आता नागरिकांना ‘ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यावरच’ पूर्णपणे अवलंबून राहावं लागत आहे. मात्र अशा परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा केला नसल्याने, नागरीक संतप्त आहेत. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंड यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली.
काय म्हणाल्या वयोवृद्ध महिला?
पंधरा दिवस ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा केला नसल्यामुळे, पिंपरी गावातील शिंदेवस्ती भागातील वयोवृद्ध महिलांनी ‘ग्रामपंचायत पाण्याच्या टाकी’पाशी हंडा घेऊन ठिय्या आंदोलन केलं. यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत या वयोवृद्ध महिला म्हणत आहेत, आमच्यावर दया करा, आम्हाला कोणीही नाही, जवळच्या कुठल्याही विहिरीत पाणी नाही. पंधरा दिवस झालं पाणी आलं नाही, आम्ही पाण्याशिवाय जगू शकत नाही, आम्ही कुठं जाऊ?
माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत पिंपरीने पाणीपुरवठा केला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वयोवृद्ध महिलांना हंडाभर पाण्यासाठी आक्रोश करावा लागत असून, pic.twitter.com/XHH1ymKL5n
— महाराष्ट्र लोकशाही (@MahaLokshahi) April 8, 2022
काय म्हणाले शिक्षक आणि विद्यार्थी?
गेल्या पंधरा दिवसांपासून शिंदेवस्ती भागात पाणी पुरवठा झाला नसल्याने, या भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील पाण्याचा मोठा सामना करावा लागत आहे. ‘शिंदेवस्ती’मधील जिल्हा परिषद शाळेतील पाण्याची टाकी कोरडी पडली असल्याने, विद्यार्थीना घरूनच पाण्याची बाटली भरून आणावी लागत आहे. मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना एक लिटरची बाटली पुरत नसल्याचं चित्र आहे. शिवाय बाटलीतले पाणी देखील तापमानामुळे गरम होत असल्याचं, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितलं.
जिल्हा परिषद शिंदेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक ‘कांबळे सर’ म्हणाले, पाण्याची खूपच बिकट परिस्थिती असून, विद्यार्थ्यांना घरूनच बाटली भरून आणायला सांगितलं आहे. यासंदर्भातली माहिती शाळेच्या व्यवस्थापन समितीला दिली असून, आज व्यवस्थापन समिती अर्ज करण्यासाठी माळशिरस पंचायत समितीत गेली असल्याची, माहितीही मुख्याध्यापक ‘कांबळे सर’ दिली.
हे देखील वाचा E-gram swaraj: असा चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी, आणि उठवा सरपंचाचा बाजार..
महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने सोशल मीडियावर भामट्याचा धुमाकूळ; अनेकांना दमदाटी आर्थिक फसवणूक..
PM Kisan: पीएम किसान योजनेत बदल करण्यात आलेले he दोन नियम जाणून घ्या, अन्यथा हप्ते होतील बंद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम