मनसेच्या पदाधिकाऱ्याने पक्ष कार्यालयावर भोंगे लावले म्हणून पोलिसांकडून अटक, एवढेच नव्हे तर..

0

काल राज ठाकरे यांचा शिवतिर्थावरचा गुढ़ीपाडवा मेळावा चांगलाच चर्चेत आला आहे. कारण काल राज यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला. राज ठाकरे यांनी काल मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत एक महत्वाचे वक्तव्य केले. मशिदींवरील भोंगे आता उतरावेच लागतील असे वक्तव्य करत मग आपण देखील भोंगे लाऊन हनुमान चालीसा लावायची. कोणी सांगितले भोंगे लाऊन प्रार्थना करायला? आपले धर्म आपापल्या घरात ठेवा असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.

 

राज ठाकरेंनी काल वक्तव्य केल्याचा परिणाम आज लगेच पाहायला मिळाला. कालच्या राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील या वक्तव्याचा परिणाम आज पाहायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांनी मुंबई येथील चांदिवलीमध्ये आपल्या मनसे पक्ष कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालिसा आणि गणेश आरती केली. सबंधित प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी हे पक्ष कार्यालयावर लावण्यात आलेले भोंगे जप्त केले. त्यांनतर पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले.

महेंद्र भानुशाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर भानुशाली यांना पाच हजार रुपये दंड भरुन सोडून देण्यात आले आहे. त्याचसोबत पुन्हा असे भोंगे लावू नये अशी नोटीस देखील पोलिसांनी दिली आहे. परंतु कारवाई होऊन देखील महेंद्र भानुशाली डगमगले नाहीत. मी यापुढे अजून भोंगे लावणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यामध्ये तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नक्की काय प्रकार घडला? वाचा सविस्तर:              आज चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी आपल्या पक्ष कार्यालयवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा आणि गणपती आरती वाजवली. त्यांच्या पक्ष कार्यालय भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. सदर प्रकरणाची पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलीस भानुशाली यांच्या कार्यालयात आले व त्यांनी महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये आणले. महेंद्र भानुशाली यांना पाच हजार रुपये दंड आणि 149 ची नोटीस देऊन त्यांना सोडून दिले.

महेंद्र भानुशाली यांना अटक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी मनसे नेत्या रिटा गुप्ता, घाटकोपर विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल, मनसेचे एकमेव नगर सेवक संजय तुर्डे इत्यादी पदाधिकारी घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. जवळपास दीड ते दोन तासात महेंद्र भानुशाली यांची सुटका पोलिसांनी केली. या वेळी मनसे नेत्या रिटा गुप्ता यांनी आपण सर्व सैनिकांना असे भोंगे लावण्याचे आवाहन केले. हा ट्रेलर होता आता ठिकठिकाणी असेच होणार असे मनसे कांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

Property Rights: वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या निधनानंतर जावई आणि नातवांचा हक्क; कोर्टाने दिला हा मोठा निर्णय 

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार.. 

Property Rights: वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या निधनानंतर जावई आणि नातवांचा हक्क; कोर्टाने दिला हा मोठा निर्णय 

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंगने आत्तापर्यंतचा सर्वोत्तम फोन केला लॉन्च; किंमत,फिचर्स, कॅमेरा जाणून तुम्हालाही बसेल धक्का.. 

शेती: शेतात जाईला रस्ता नाही? चिंता करू नका, असा करा घरबसल्या अर्ज तहसिलदार येईल बांधावर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.