Gudipadwa 2022: ‘ही’ आहे गुढीपाडवा उभारण्याची योग्य पद्धत; गुढीपाडव्याविषयी जाणून घ्या अधिक..
‘हिं ‘दू’ ‘ध ‘र्मा’ त’ गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा असल्याने, याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि म्हणून हिं दू ध र्मा ती ल लोक नवीन व्यवसायाला उद्योगाला सुरुवात करण्यासाठी अनेक वेळा गुढीपाडव्याची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येक जण आयुष्यातील नव्या संकल्पाची सुरुवात करताना पाहायला मिळतो. गुढीपाडव्याची नूतन संवत्सराची सुरुवात म्हणून, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. आणि म्हणून प्रत्येकजण या दिवशी आपल्या दारापुढे गुढी उभारुन नव्या संकल्पाची सुरवात करतो.
जसा की तुम्हाला माहिती आहे, आपल्या राशिचक्राची सुरुवात ही मेष राशीपासून होत असते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करत असल्याने, चैत्र हा वर्षांतील पहिला महिना ठरतो. आणि वर्षांरंभाचा शुभ दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसार याच दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे बोललं जाते. आणि म्हणून या दिवशी गुढिपाडवा साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात देखील गुढीपाडवा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केल्याचे पाहायला मिळते.
कधी आहे गुढीपाडव्याचा मुहूर्त
१ एप्रिल २०२२ पासून सकाळी अकरा वाजून ५३ मिनिटांनी फाल्गुन अमावस्या संपणार आहे. अमावस्या संपल्यानंतर लगेच प्रतिपदा स्थितीला सुरुवात होणार आहे. तिथीनुसार यावर्षी गुढिपाडवा २ तारखेला साजरा केला जाणार आहे. हा दिवस अत्यंत शुभ असल्याने प्रत्येकाने या दिवशी संकल्पना करणे, गरजेचे आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मनात कुठलीही शुभकामना केली, तर ती पूर्ण होते असं बोललं जातं. जसं की आपल्याला माहिती आहे, या दिवशी आपण अनेक नवीन गाड्या किंवा नवीन व्यवसायात पाऊल टाकत असतो. याचे एकच कारण असते, हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकलं, तरी त्यात यश हे हमकास मिळते, असं बोललं जातं.
गुढी उभारण्याची ही आहे योग्य पद्धत
साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक जण विविध संकल्पना करत असतात. हा दिवस आनंदाचा दिवस असल्याने, घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतं. प्रत्येक जण गुढी उभारण्यात व्यस्त असतो. घरातील लहान बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत गुढीची पूजा अर्चना करत असतात. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. गुढी उभारण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असणं देखील आवश्यक आहे. सर्वात प्रथम तुम्हाला गुढी उभारण्यासाठी एक मोठी साधारण पंधरा ते वीस फुटी स्वच्छ काठी लागणार आहे. ज्या काठीवर आपण गुढी उभारणार आहोत, ती अगोदर स्वच्छ पाण्याने धुऊन घेणं आवश्यक आहे. काठी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर, त्या काठीच्या वरच्या बाजूला एखादं सुती रेशीम वस्त्र बांधून घ्यायचे आहे.
काठीला आपण वरच्या साईटला रेशीम वस्त्र बांधून घेतल्यानंतर, घरातील चांदीचे किंवा तांब्याचे एखाद भांड काठीच्यावर बसेल अशा आकाराचं आपल्याला घ्यायचा आहे चांदीचे भांडे नसेल, तर आपण स्वच्छ एखादं भांड घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही काठीच्या वरच्या साईडलाच कडुनिंबाची पाने, आंब्याच्या फांद्या आणि साखरेची माळ बांधणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपण काठी उभी करणार आहोत, त्या ठिकाणची जागा अगोदरच स्वच्छ करुन घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही रांगोळी देखील काढू शकता. ही गुढी उभारत असताना तुम्ही घरातील सर्व सदस्य उपस्थित असतील याची काळजी घ्या. हळद, कुंकू, फुले वाहून तुम्ही गुढीची पूजा करणं आवश्यक आहे.
ही सृष्टी ब्रह्मदेवाने बनवली आहे, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिली असल्यामुळे, तुम्ही उभारलेल्या गुढीला ब्रह्मध्वज असे देखील म्हटलं जातं. म्हणून तुम्ही या गुडीची ब्रह्मदेवाचे नामस्मरण करून प्रार्थना करू शकता.
ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।। अशी प्रार्थना तुम्ही केली तर हे तुमच्यासाठी खूप शुभ मानलं जातं. जर तुम्हाला प्रार्थना येत नसेल, तर तुम्ही मोबाईलवर देखील ही प्रार्थना ऐकू शकता.
ब्रह्मदेवाची प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही. कडुलिंबाचा मोहोर, गूळ, आदी घालून केलेला प्रसाद सर्वांना द्यायचा आहे. विशेष म्हणजे हा प्रसाद तुम्हाला खायचं आहे. हा प्रसाद कडू लागत असला, तरी याला विशेष महत्व आहे. ही गुढी तुम्ही सकाळी दिवस उगवताना उभारायची आहे. तर संध्याकाळी सूर्यास्त होताना ही गुड्डी तुम्ही उतरवायची आहे. ही गुढी उतरवताना देखील तुम्ही ब्रह्मदेवाचे प्रार्थना करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही गुढी उभारताना काळजी घेऊन, मोठ्या श्रद्धेने या सणांचा आनंद घेत नवीन वर्षात पदार्पण करायचं आहे.
हे वाचलंय का? Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..
E Shram Card: केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! ई-श्रम कार्ड; धारकांना मिळणार दोन लाख रुपये..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम