ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..
कुठलंही नातं जोपासत असताना प्रेम खूप महत्त्वाचं असतं. प्रेमाशिवाय कुठलंही नातं जपलं जाऊ शकत नाही, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. खासकरून नवरा-बायको हे नातं असं असतं, ज्यात प्रेम आपुलकी, काळजी, स्वातंत्र्य नसेल तर, हे नातं किळसवाणे वाटू लागते. पूर्वीपेक्षा आता लग्नानंतर पत्नीला अधिक स्वातंत्र्य मिळतं, याविषयी देखील फारसं बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र आपण अलीकडच्या काळात महिलांना जास्त स्वातंत्र्य देत असलो तरी, ते कुठपर्यंत द्यायचं याला देखील मर्यादा आहेत. मात्र एका पट्ट्याने लग्नानंतर आपल्या पत्नीला मझ्या व्यातिरिक्त तू तुला आवडणाऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत, असं म्हटल आहे. हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल, मात्र याविषयी स्वतः पत्नीनेच खुलासा केला आहे.
प्रेमाशिवाय लग्नासारखे नाते टिकवणे जवळजवळ अशक्यच आहे. मात्र, लग्न झालेल्या नवरा बायको यांच्या बाबतीत असे अजिबात नाही. हे दोघे गेल्या वर्षभरापासून लग्नाच्या नातेसंबंधात आहेत. मात्र या दोघांचे एकमेकांवर अजिबात प्रेम नाही. मग तुम्ही म्हणाल यांच्यामध्ये प्रेम नाही, तर हे एकत्र का राहिले आहेत. तर त्याचे देखील आश्चर्यकारकच कारण आहे. या दोघांपैकी कोणालाही जर एखाद्या दुसऱ्या व्यातिशी अफेअर करायचे असेल, तर यात देखील त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. आणि या एकाच कारणावर यांचे नाते टिकून आहे. या दोघांच्या नातेसंबंधांवर मनमोकळेपणाने अविनाशची पत्नी बोलली आहे. जाणून घेऊया काय म्हणतेय त्याची पत्नी….
माझं लग्न झालं असून, मी एक विवाहित स्त्री आहे. माझे लग्न होऊन फार काळ झाला नाही, माझ्या लग्नाला साधारण एक वर्ष झालं असेल. या नात्यात माझ्याकडे प्रेमाशिवाय सर्व काही आहे. आणि म्हणूनच, मी या नात्यात आतापर्यंत राहिले आहे. तसं पाहायला गेलं तर, मी पहिल्यापासूनच आधुनिक विचारांची राहीली आहे. लहानपणापासूनच मला माझ्या आई-वडिलांनीही कधीच त्यांचे कठोर निर्णय माझ्यावर लादले नाहीत, कधीही कुठल्या बंधनात ठेवले, नाही. मला जे करावसं वाटलं, ते करण्यापासून मला त्यांनी कधीही रोखले नाही. मला माझ्या नवऱ्याकडूनही अशाच प्रकारची अपेक्षा होती. माझ्या नशिबाने मला अशाच विचाराचा अविनाश भेटला.
मला आतापर्यंत जेवढी मुलं भेटली, तेवढ्या सगळ्यात अविनाश वेगळा होता. तो अतिशय शांत स्वभावाचा आणि जास्त न बोलणारा होता. आम्ही जेव्हा लग्नासंदर्भात पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्याने मला स्पष्टपणे सांगितले, तू तुझे आयुष्य तुझ्या स्वतःच्या अटींवर पूर्ण जगले पाहिजे, अशी माझीही इच्छा आहे. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही. एका मुलीला आणखी काय हवं असतं. लहानपणापासून मी ज्या पद्धतीने जगात आलीय त्याच पद्धतीने मला माझे राहिलेले आयुष्य जगता येईल, या भावनेतून मी लग्नाला लगेच होकार दिला.
आम्ही एकमेकांना चांगले ओळखल्यानंतर लग्न केले. लग्नानंतर अविनाशने मला कधीही आमच्या नात्यात काही सीमा आहे असं वाटू दिले नाही. जी मला पाळावीच लागेल. माझं लग्न झालं असलं तरीदेखील, आम्ही पती पत्नी नसून एक जिवलग मित्र आहे, असच मला वाटतं. आम्ही पती-पत्नी असलो तरी, देखील आमच्या या नात्यात का कुणास ठाऊक अजूनही, हवी तेवढी शारीरिक जवळीक वाढली नाही.
रोमँटिकच्या बाबतीत गुंतलेलो नाही
लग्न म्हटलं की रोमँटिक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. मात्र आमच्या दोघांमध्ये असं कुठलेही रोमँटिक नातं नाही. तरीदेखील, मी आमच्या लग्न या नात्यात खूप आनंदी आहे. कारण माझ्यासाठी देखील प्रेम फारसं महत्वाचं नाही. मला माझे आयुष्य एकांतात घालवायचे होते. आणि म्हणून मला देखील माझे आयुष्य अशा माणसासोबत घालवायचे होते, जो माझ्या सोबत असूनही त्याच्याच नादात असेल. खरंतर मला समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या सहवासाची गरज होती. मला माझी स्वप्ने समजून घेणारा व्यक्ती हवा होता, माझ्यावर त्याचे निर्णय लादणारा जोडीदार मला कधीही नको होता. जर असं काही असतं, तर आम्ही केव्हाच वेगळे झालो असतो. आणि म्हणूनच आमच्या दोघांमध्ये प्रेम नसूनही, आम्ही एकत्र आहोत.
कुटुंबाला हे कळले नाही पाहिजे..
आपण दोघे एकमेकांवर प्रेम करत नाही याविषयी कुटुंबाला आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रांना याविषयी अजिबात समजलं नाही पाहिजे. असा अविनाशचा आग्रह असतो. या व्यतिरिक्त त्याची कुठलीही अपेक्षा नाही. लग्नापूर्वी मी माझ्या जोडीदाराची ज्या पद्धतीने कल्पना केली होती, अविनाश बरोबर तसाच असल्याने, प्रेम नसूनही मी या रिलेशनशिपमध्ये खूप आनंदी आहे. मी देखील आम्ही प्रेमात ् एकमेकांमध्ये गुंतलेलो नाही, याविषयी कोणालाही कळू देत नाही. त्यामुळे अविनाश देखील खूप खुश आहे.
आम्ही फक्त या कारणासाठी एकत्र..
लग्नानंतर अनेक जोडपे पार्टीचे नियोजन करत असतात. त्याचप्रमाणे आम्ही देखील विविध पार्ट्यांमध्ये जातो. एवढेच नाही तर, आम्हीं दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकमेकांना प्रेमासंदर्भातले मेसेजेस टाकत असतो. मात्र हे प्रेमापोटी नाही, तर इतरांना आम्ही देखील एकमेकांवर प्रचंड प्रेम करत आहोत हे दाखवण्यासाठी करत असतो, तशी अविनाशचीच इच्छा असते. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये प्रेमाची कमतरता आहे, असं कोणालाही वाटत नाही.
एवढंच नाहीतर, आम्ही सुट्ट्या काढून आनंद देखील घेतो. गेल्या वर्षी आम्ही ‘मियामी’ला गेलतो. जिथे आम्ही दोघांनी एकत्र खूप छान वेळ घालवला. जेव्हा आम्ही एकत्र प्रवास करत असतो, तेव्हा आम्ही एकमेकांसोबत फारस बोलत नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर, आम्ही दोघेही एकमेकांच्या कामात व्यस्त होतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे.
इतर पुरुषांशी संबंध
लग्नानंतर अनेक जण मुलीला स्वातंत्र्य देत नसल्याने, दोघेही वेगळं होताना पाहायला मिळतात. मात्र आमच्या दोघांमध्ये स्वातंत्र्याविषयी अविनाश फार पुढे आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. मी इतर पुरुषांसोबत जर संबंध ठेवले, तर अविनाशला याविषयी देखील अजिबात शंका नसते. एवढेच नाही, तर जेव्हा मी असं करते तेव्हा तो खूप आनंदी देखील असतो. मी इतर लोकांशी बोललं पाहिजे, अशी देखील त्याची इच्छा असते. त्यासाठी तो अनेक लोकांशी माझी ओळख देखील करून देतो.
जर तुम्हाला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्याची इच्छा असल्यास तुम्ही तसे करण्यास हरकत नाही. असंही तो बोलतो. या विषयी त्याला अजिबात वाईट वाटत नाही. आपल्या नातेवाईकांना आणि कुटुंबातील सदस्यांना आपल्या आयुष्यात काय चाललंय, याविषयी माहिती मिळाली नाही पाहिजे, याविषयी मात्र तो खबरदारी घ्यायला सांगतो, याव्यतिरिक्त त्याची कुठलीही तक्रार नसते.
मी देखील या विषयी खबरदारी घेते, कारण आम्हा दोघांनी देखील कुटुंबातल्या कोणी सदस्याने या विषयी प्रश्न उपस्थित करू नये. असं मला वाटतं, कारण प्रत्येकजण आपल्याला समजून घेईलच असं नाही. आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंधाविषयी आकर्षण नसतं तरी देखील आम्ही या नात्यात खूप आनंदी आहोत. आणि मला देखील या नात्यात जोपर्यंत आम्ही दोघेही आनंदी आहोत, तोपर्यंत यामध्ये काहीही चूक नाही, असं मलाही वाटतं.
तुमच्या आयुष्यात देखील अशी एखादी कथा असेल तर तुम्ही आमच्या maharashtralokshahi@gmail.com वर पाठवू शकता. तुमचे नाव कुठेही सांगितले जाणार नाही. हा लेख आम्ही TOI या वेबसाइट वरून घेतला आहे. जर हा लेख तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचायचा असेल तर यावर क्लिक करा..
हे देखील वाचा रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ…
‘या’ कारणांमुळे उडालाय उष्णतेता भडका; ..उन्हात ‘घ्या’ ही काळजी, अन्यथा उष्माघातामुळे होईल..
इरफान पठानच्या पत्नीचा मनमोहक चेहरा आला समोर; सुंदरता पाहून चाहते झाले घायाळ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम