:हापूस’च्या नावाखाली आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही; ‘ही’ आहे नवी योजना

0

हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार अलीकडच्या काळात अधिकतेने जाणवताना दिसतो. हापूस म्हणून, हापूस सारखा दिसणारा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने, ग्राहकांची खुप सहज फसवणूक होते. त्यामुळे अनेकांची आंब्याचा सीझनला हापूस खायची इच्छा ही फक्त इच्छाच राहते. आणि म्हणून आता कृषी पणन मंडळाने उत्पादक ते थेट ग्राहक अशी साखळी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी पणन मंडळाने उत्पादक ते थेट ग्राहक अशी साखळी असणारा उपक्रम हाती घेतला असून, ग्राहकांच्या सेवेसाठी असणाऱ्या या उपक्रमाला यश मिळेल अशी आशाही व्यक्त केली आहे. भौगोलिक मानांकन मिळवलेल्या ‘हापूसचे स्टॉल: आता उभारण्यात आले असून, हापुस आंब्याचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

कृषी पणन मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे आता खरेदी केंद्राच्या माध्यमातूनच हापूस आंब्याची विक्री होणार असल्याने ग्राहकांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे. या उपक्रमासाठी सात मार्चपासून नोंदणी देखील सुरू करण्यात आली असल्याचे, मंडळाने सांगितले आहे. आतापर्यंत हापूसच्या नावाखाली इतर आंब्याचीही विक्री केली जात होती. त्यामुळे जास्त पैसे देऊनही ग्राहकांना हापूसची चव काही चाखता येत नव्हती. गेल्या अनेक महिन्यांपासून हा विचार सुरू होता, मात्र आता अखेर यात आम्हला यश मिळाले आहे. असं मंडळाने सांगितले आहे.

आता ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून, ही यंत्रणा आता जोमाने काम करत आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये देखील शासकीय स्टॉलच्या मदतीने, हापूस आंबा ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे, त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे आता ग्राहकांची फसवणूक होणार नसून, हापूस प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे, कृषी पणन मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाला आंबा बागायतदार शेतकरी देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. त्याच बरोबर ज्यांना स्टॉल उभारायचा आहे, अशा शेतकऱ्यांना रत्नागिरी येथील कृषी पणन मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

स्टॉल नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

ज्या सातबारा उताऱ्यावर आंबा कलम केलेली नोंद आहे, तो सात बारा, आधार कार्ड, त्याच बरोबर स्टॉलवर कोण विक्री करणार आहे? त्याचे आधार कार्ड, आणि सगळ्यात महत्वाचं कोरोना लस घेतल्याचं प्रमाणपत्र, देखील आवश्यक आहे. अशांनाच स्टॉल नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

प्रतवारीनंतरच होणार आहे खरेदी

एवढं सगळं करून देखील, स्टॉलला लावलेल्या आंब्याचा दर्जा चेक करण्यात येणार आहे. हे सगळं तपासण्यासाठी स्कॅनिंगची सोय असणार आहे. कसल्याही प्रकारची ग्राहकांची फसवणूक होणार नाही. स्कॅनिंगमुळे, आंब्याच्या साक्याचं प्रमाण समजणार आहे. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर यांचा एकच ब्रॅंण्ड असणार आहे. आणि त्यांच्याच नावाखाली स्टॉलवरचे सगळे आंबे विकले जाणार आहेत.

हे देखील वाचा. लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही! ‘फिल्मी कहाणी’ वाचा सविस्तर..

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण..

पंजाब,गोवा, उत्तराखंडसह यूपीतही काँग्रेसचीच सत्ता? वाचा काय म्हणतायेत एक्झिट पोल..

केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर पुन्हा वाढतील का? वाचा सविस्तर

राज्य सरकारचा धमाका! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार तब्बल एक लाख बिनव्याजी कर्ज

सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा निर्यातीवर परिणाम होणार? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.