स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात सोडले साप; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ…

0

शेतीला दिवसा द्या, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी कोल्हापूर मधील महावितरणांवर आपले आंदोलन सुरूच ठेवलं आहे. आता शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून, या आंदोलनाची धार तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाची तीव्रता आता वाढली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठिक ठीकाणी सरकारी कार्यालयात साप सोडत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलकांची मागणी ही रात्री आठ ते पहाटे चार या वेळात लाईट नको, या व्यतिरिक्त आम्हा, शेतकऱ्यांना कधीही वीज द्या, आमची काहीही हरकत नाही. रात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी गेल्यानंतर अचानक सापावर पाय पडतो. तो दंश करतो, आणि शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. रात्री दवाखान्यात जाण्याची देखील सोय नसते. आमची मागणी फक्त दिवसा लाईट मिळावी एवढी साधी आहे. तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. असं राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आंदोलक स्थळी भेट दिली. त्यांनी तोंडी आश्वासन देखील दिले, मात्र एवढी साधी मागणी असताना देखील लोकप्रतिनिधी मान्य करू शकत नसतील, हे खूप मोठे दुर्दैव असल्याचं यावेळी राजू शेट्टींनी सांगितले. शेतकऱ्यांवर इतर प्राण्यांकडून हल्ला झाला तर, सरकार त्याची नुकसानभरपाई म्हणून 14 लाख रुपये देते. मात्र सर्पदंश झाल्यावर सरकार म्हणतं, हा वन्यप्राणी नाही. हा निव्वळ ढोंगीपणा आहे. रात्री वीज देता आणि मग सापाने दंश केल्यावर मृत्यू झाल्यावर त्याला वाऱ्यावर सोडता,असं म्हणत, राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. इचलकरंजी महावितरण कार्यालयात प्रशांत राठी यांच्या टेबलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क साप सोडल्याचे देखील पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत राठी यांच्या टेबलावर साफ सोडल्यानंतर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाले.

गेल्या मंगळवारपासून राजू शेट्टी देखील महावितरण कार्यालयात ठिय्या मांडून बसलेले आहेत. अद्याप तोडगा निघाला नसल्याने, राजू शेट्टी यांनी आवाहन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी महावितरण कार्यालयात साप सोडल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल झाला असून, कोर्टाने देखील न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: शिवसेनेच्या अडचणी वाढल्या,दोन दिवस उलटून गेले तरी अजूनही आयकर विभागाची छापेमारी सुरूच; काय काय सापडलं..

अमृता फडणवीस बेअक्कल आणि डान्सबारमध्ये नाचणारी बाई; राष्ट्रवादीच्या या नेत्याची जीभ घसरली, पहा व्हिडिओ

पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा! नाना पटोले आणि बच्चूकडू ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं उघड; गृहमंत्री म्हणाले..

व्हिडिओ: टोमणे मारण्यात पटाईत असणाऱ्या पुणेकरांची अजित पवारांनी एकदम खरडपट्टीच केलीय; एकदा पहाच…

केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.