केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले…
लोकसत्ता’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddahv Thackeray) यांची काल मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना, भाजपच्या (bjp) केंद्रीय नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार लोकशाहीला किती घातक आहे, याविषयी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर देखील जोरदार हल्ला केला.
एवढ्या वर्षानंतर स्वप्न सत्यात उतरलं, देशातल्या जनतेने भरभरून प्रेम दिले, 300 पेक्षा जास्त दोन खासदार निवडून दिले. मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी अजूनही आपण काँग्रेसने (Congress) 70 वर्षे काय केलं? हेच म्हणत बसलो मिळालेल्या संधीची माती करत आहोत. ही गोष्ट केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात येत नाही. हे मोठं दुर्दैव आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या-ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही, त्या राज्याला कसं छळलं जातंय? आपण हे सर्वजण पाहतोय, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
देशातल्या केंद्रीय यंत्रणा, जाणून-बुजून मुद्दाम विरोधी पक्षाला टार्गेट करतायत असं वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंचा संताप पाहण्यासारखा होता. उद्धव ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे(bjp) नेते गंगेत स्नान केलीले आहेत. आणि बाकीचे सगळे गटारातून आलेत, असं त्यांना वाटतंय. वाटू द्या. दिवस प्रत्येकाचे येत असतात. महाराष्ट्रात (Maharashtra) घरोघरी गांजाची शेती केली जाते, असं हे चित्र उभा करत आहेत. दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गुजरात (Gujarat) एअरपोर्टवर ट्रग्स सापडलं, जप्त करण्यात आलं. मात्र महाराष्ट्रात एक ग्रॅम सापडलं तर महाराष्ट्रात घरोघरी गांज्याची शेती केली जाते, असंच चित्र संपूर्ण देशात उभं केलं.
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर बोलायचं झालं तर, देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही दोनच राज्य केंद्रीय यंत्रणांना माहीत आहेत. इतर राज्यात काही घडतच नाही, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोकशाहीसाठी हे खूप घातक आहे. भाजप नको, यापेक्षा आमची देशाला कसलं राजकारण हवं आहे. देशाचा विकास कसा करता येईल, देशाचं हित कशात आहे, या गोष्टींवर आम्ही चर्चा करत आहोत. आघाडी करून महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सरकार चालू आहे, तसेच देशपातळीवर देखील झालं तर आम्ही त्यात सहभाग असू, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपासोबत आमची युती विचारांवर झाली होती. मात्र अलीकडच्या काळात भाजपला विचारच राहीला नाही. भाजपला आता फक्त सत्ता पाहिजे, देशात सत्ता पाहिजे, राज्यात सत्ता पाहिजे, महानगरपालिका ग्रामपंचायती या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता हवी आहे. जर त्यांना सगळीकडे सत्ता हवी असेल तर, आम्ही कुठे जायचं? त्यांची धुणी-भांडी करायची का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत, शिवसेना स्थापन करण्याचा उद्देश हा धुणीभांडी करणाऱ्यांना देखील अभिमानाने जगता यावं, यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टिवर केला.
कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थिती देखील, महाराष्ट्र राज्याने ज्या पद्धतीने काम केलं, त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने देखील केलं. मात्र आता त्यातही भ्रष्टाचार झाला असल्याचा, आरोप भाजपकडून करण्यात येतोय. या विषयी काय बोलणार? मला वाटतं, कोरोना बरोबर, यांना विकृतीच्या लाटेनंही घेरलंय, असं मला वाटू लागलंय. मात्र ही विकृती रोखावी लागणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकसत्ता’च्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात, वर्षवेध मा वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमानिमित्ताने अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्ला केल्याने, आता भारतीय जनता पार्टीकडून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-. अजित पवार संभाजीराजे यांना उद्देशून म्हणाले..”घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात” पहा व्हिडिओ…
मराठा आरक्षण आणि उपोषणावरून संभाजी राजेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..
प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही...
पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम