मराठा आरक्षण आणि उपोषणावरून संभाजी राजेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी राजे आज पासून आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजे यांनी 26 तारखेपासून आपण उपोषण करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केले होतं. मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आता आमरण उपोषण सुरू केलं आहे. एकीकडेकडे संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांनी मराठा आरक्षण आणि संभाजी राजे यांची खिल्ली उडवल्याचं बोललं जात आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं असून, संभाजीराजे यांना भेटण्यासाठी अनेक नेते येत असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविन दरेकर, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील यांनी देखील आझाद मैदानावर जाऊन संभाजी राजे यांची भेट घेतली आहे. संभाजीराजे यांनी उपोषण पुकारल्यामुळे अनेक ठिकाणी मराठा समाजाचे नेते आंदोलन करताना देखील पहायला मिळत आहेत.

एकीकडे संभाजीराजे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाच्या हिताच्या काही मागण्या करत आमरण उपोषण पुकारलं असल तरी, दुसरीकडे मात्र, मराठा आरक्षण आणि संभाजी राजे यांच्या उपोषणाची खिल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडवल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र संभाजीराजे यांचे उपोषण आणि मराठा आरक्षणची खिल्ली अजित पवार यांनी उडवली अशी चर्चा सोशल मीडियावर का होतेय? या विषय आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांचा लेखाजोखा घेतला. त्याच दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा देखील रंगल्याचे पाहायला मिळाले. विशिष्ट शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी आज पुणेकरांना चांगलेच टोमणे मालल्याने या पत्रकार परिषदेची चर्चा झाली. तळजाई टेकडीवर झालेल्या घाणीबद्दल अजित पवार चांगलेच संतापल्याचे देखील दिसून आले.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अजित पवारांनी उत्तर दिली. मात्र एका पत्रकार महिलेने संभाजीराजेंनी आज मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या संदर्भात काय सांगाल, या प्रश्नाचे उत्तर देताना, मात्र अजित पवार म्हणाले, म्हणाले, “घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात…” पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, हे वक्तव्य कमालीचं व्हायरल देखील झालं.

अजित पवारांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा देखील पिकला. मात्र हे वक्तव्य करत असताना, अजित पवारांनी मराठा आरक्षण आणि छत्रपती संभाजीराजे यांची खिल्ली उडवली, असं अजिबात म्हणता येणार नाही. अजित पवार आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. एखाद्या कार्यक्रमात किंवा प्रचारात त्यांनी वापरलेली काही वाक्ये खूपच मजेशीर आणि गंमतीशीर असल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं असेल.

हेही वाचा   अजित पवार संभाजीराजे यांना उद्देशून म्हणाले..”घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात” पहा व्हिडिओ…

प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान..

नवाब मलिक कधीच महसूल मंत्री झाले नाहीत,मग ईडीने महसूल मंत्री असताना घोटाळा झाला असं का म्हटलं? शरद पवार आक्रमक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.