नवाब मलिक कधीच महसूल मंत्री झाले नाहीत, मग ‘ईडी’ने महसूल मंत्री असताना घोटाळा झाला असं का म्हटलं? शरद पवार आक्रमक…
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते, नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. या विरोधात महाविकास आघाडीडी सरकार आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुढबुद्धीने केलेली ही कारवाई असून, याचा निषेध म्हणून, महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळ (Mantralay) महात्मा गांधी पुतळ्यापाशी अनेक बड्या नेत्यांच्या उपसथितीत आंदोलन देखील केले.
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नवाब मलिक यांना ईडीने भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच अटक केली असल्याचं बोललं जात असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालिकांवर कारवाई करताना ईडीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये म्हंटले आहे, नवाब मलिक यांनी महसूल मंत्री असताना हा घोटाळा केला आहे.
ईडीने केलेल्या या दाव्यामुळे आता ईडी देखील अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे नवाब मलिक हे कधीच महसूल मंत्री झाले नाहीत. नवाब मलिक एकूण पाच वेळा महाराष्ट्राचे मंत्री झाले, मात्र एकदाही ते महसूल मंत्री झाले नव्हते. मग ईडीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये असं का म्हटलं? याचीच चर्चा आता जोरदार रंगली असून, यामुळे आता चांगलाच गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
अगोदरच केंद्रीय यंत्रणां ह्या भाजपच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होत असतानाच ईडीकडून झालेली ही मोठी चूक आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांनी देखील आता या प्रकाराची दखल घेतली असल्याचं बोलल जात आहे. या प्रकारासंदर्भात नवाब मलिक यांची मुलगी,निलोफर यांनी देखील पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता. आता राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्रीय यंत्रणा या फक्त विरोधकांच्या नेत्यांवरच धाडी टाकते. सत्ताधाऱ्यांवर कारवाई करताना या यंत्रणा पाहायला मिळत नाहीत. यांचा जन्म हा फक्त विरोधाच्या नेत्यांना अटक करण्याकरिताच झाला आहे. असा आरोप गेल्या काही वर्षापासून होताना पाहायला मिळतो. ज्या-ज्या राज्यांत भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही, त्या राज्यात विरोधकांवर मोठ्याप्रमाणात केंद्रीय यंत्रणा कारवाई करत असल्याचा दिसून येतं. पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जीच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली होती.
राष्ट्रवादीनंतर ईडीचा शिवसेनेला दणका; शिवसेनेच्या या नेत्यावर धाड, संध्याकाळी होणार अटक..
या कारणामुळे देशमुख,भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीने पाठ फिरवली; अजित पवार स्वतः म्हणाले…
या कारणांमुळे हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्या; ईडीने स्वतः केला धक्कादायक खुलासा...
कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम