बेकायदेशीररित्या १३९ कोटी रुपये काढल्या प्रकरणी ‘लालूं’ना पाच वर्षाची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि RJD पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना आज सोमवारी चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. १९९०-९२ मध्ये डोरंडा कोषागारातून बेकायदा १३९ कोटी काढल्याचे आरोप यापूर्वीच सिद्ध झाले होते. आज न्यायालय फक्त किती शिक्षा द्यायची हे ठरवणार होतं. या प्रकरणात त्यांना पाच वर्षाची शिक्षा आणि 60 लाख दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रांची येथील विशेष सीबीआय न्यायाधीश एसके शशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्द्वारे शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात न्यायालयाकडून 15 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 जणांना दोषी ठरवले होते. डोरंडा खटल्यात शिक्षा होऊन देखील तालुका सात या दोन्ही मोकळी सुटू शकतील असं त्यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं होतं कारण लालू प्रसाद यादव यांनी आतापर्यंत एकूण 36 महिन्यांची शिक्षा भोगली आहे. इकडे शिक्षेची घोषणा होण्यापूर्वीच लालूंची प्रकृती खालावली, असल्याची माहिती आहे. त्याचा रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढली.
या खटल्यात शिक्षा होणार आहे हे यापूर्वीच माहित असलेल्या लालूप्रसाद यादव हे रात्रीपासूनच तणावात होते. सकाळी लालू प्रसाद यादव यांची साखर १६० वर पोहोचली. त्याचबरोबर त्याचा रक्तदाब देखील १५०/७० वर पोहोचला आहे. त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर विद्यापती यांनी सांगितले की, रात्रीपासूनच तनावात असल्यामुळे साखर आणि रक्तदाब वाढला आहे. सकाळी भेटल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल मी विचारले, मात्र त्यांनी खूपच निराशाजनक उत्तर दिले असेही डॉक्टर विद्यापती म्हणाले.
अजब प्रकरण काय?
१९९०-९२ या काळात डोरंडा कोषागारातून बेकायदा १३९ कोटी काढले. डोरंडा कोषागारतून काढलेल्या या पैशाने लालूप्रसाद यादव यांनी 400 वळू खरेदी केले. 400 वळू दिल्ली आणि हरियाणामधून आणल्याचे खोटे पुरावे तयार केले गेले. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या वाहनातून हे 400 वळू आणले होते. त्या वाहनांचे क्रमांक तपासल्यानंतर, त्या गाड्या, स्कूटर आणि मोटरसायकल असल्याचं समोर आलं. त्याचबरोबर याच वाहनांमधून, मका ,पशुचारा, वगैरे आणल्याचे दाखवल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम