‘सिलेक्टर’ का म्हणाले, विराट महान खेळाडू नाही; विराटला का केलं जातंय टार्गेट? जाणून घ्या सविस्तर..

0

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी सध्याचा काळ काही चांगला नाही. गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर , विराट कोहलीच्या हातून बऱ्याचश्या गोष्टी गेल्या आहेत. टी-ट्वेण्टी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला वनडे संघाच्या कर्णधार पदावरूनही काढून टाकण्यात आले. आणि त्यानंतर विराट आणि बीसीसीआय यांच्यातला वाद खऱ्याअर्थाने चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळाले. खासकरून सौरव गांगुली आणि विराटमध्ये फक्त मतभेदच नाही तर, मनभेद असल्याचंही दिसून आले.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सौरभ गांगुली म्हणाला, विराट कोहलीला मी टि-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देऊ नकोस, असं सांगितलं होतं. मात्र त्याने ऐकले नाही. आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटने देखील एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सौरव गांगुलीच्या या विधानाचे खंडन केले. विराट म्हणाला, असं काहीही झालं नव्हत. याऊलट मला सांगण्यात आले, तू घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. हा चांगला निर्णय आहे.

विराट कोहलीच्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली, आणि सौरव गांगुलीवर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली. या वादाचे पडसात आता सर्वत्र उमटू लागल्यानंतर, विराटसाठी मात्र, हे योग्य नसल्याचं पुढे पाहायला मिळाले. विराट कोहली विरुद्ध संपूर्ण BCCI असा सामना पाहायला मिळाला. आपल्या विरोधात बीसीसीची संपूर्ण टीम असल्याने आपल्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून देखील केव्हाही काढलं जाऊ शकतं. या भीतीने विराटने स्वतःहून आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

विराटने कसोटी संघाचा राजीनामा दिल्याने, अनेकांनी आश्र्चर्य व्यक्त केले. विराटने राजीनामा दिल्याने, आता कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले. BCCI समोर देखील विराटने दिलेल्या अचानक राजीनाम्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. कर्णधारपद निवडताना अनेक नावांची चर्चा करण्यात आली. अशा बातम्याही बाहेर आल्या. मात्र अखेर रोहीत शर्मा ‘तीन’ही भारतीय संघाचा “ऑल टाइम” कर्णधार रोहित शर्मा असल्याचं बीसीसीआयने जाहीर केले.

नुकताच श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला आहे. या दरम्यान बीसीसीआयच्या निवड समितीचे चीफ सीलेक्टर ‘चेतन शर्मा’ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्यांनी संवाद साधत असताना, विराट बाबत एक धक्कादायक विधान देखील केलं आहे. चेतन शर्मा यांनी रोहीत शर्मा हा भारताचा नंबर एक फलंदाज असल्याचे म्हंटले आहे. मात्र त्याचा थेट संबंध विराट कोहलीशी जोडला जात आहे.

विराट आणि बीसीसीसीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कटुता निर्माण झाली आहे. आणि म्हणून चेतन शर्मा यांनी मुद्दाम रोहीत शर्मा हा भारताचा ‘नंबर’वन फलंदाज असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. रोहीत शर्मा हा उत्कृष्ट फलंदाज आहे, मात्र एका निवड समिती पदावरच्या व्यक्तीने अशा प्रकारे बोललं योग्य नसल्याचे अनेक क्रिकेट दिग्गजांनी देखील म्हंटले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.