धक्कादायक खुलासा! ‘दिशा सालियान’चे मारेकरी ‘सुशांत सिंग’ला माहीत होते,म्हणून त्याचीही हत्या करण्यात आली

0

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीची कटुता निर्माण झाली असून, हा वाद आता मातोश्रीपर्यंत येऊन पोहचल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आता नारायण राणे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. नारायण राणे यांनी सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

किरीट सोमय्या वारंवार शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांवर आरोप करत असल्याने, संजय राऊत देखील चांगलेच आक्रमक झाले. शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या हा दलाल आणि भडवा असल्याचं म्हटलं. त्यासोबतच किरीट सोमय्या करत असलेले सगळे आरोप खोटे असून,उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर एकही बंगला नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

सोमय्या यांनी यापूर्वी कोर्लई गावात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावावर 19 बनले असल्याचा आरोप केला होता. मात्र रश्मी ठाकरे यांच्या नावावर जी जमीन आहे, त्या जागेत एकही बंगला नसल्याचं स्वतः कोर्लई गावचे सरपंच ‘मिसाळ’ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटल्याने किरीट सोमय्या चांगले तोंडावर आपटल्याचं पाहिला मिळाले. संजय राऊत आणि सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली.

नारायण राणे यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने, शिवसेना देखील आता अधिक आक्रमक झाल्याचे, पाहायला मिळत आहे. जुहू याठिकाणी नारायण राणे यांचा असणारा बंगला बेकायदेशीर असल्याचं म्हणत, मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली. मुंबई महानगर पालिकेने नोटीस पाठवल्यानंतर नारायण राणे पत्रकार परिषदेत घेत म्हणाले, बंगल्याचं एक इंच देखील बांधकाम बेकायदेशीर नाही. माझ्यावर झालेली कारवाई सुढबुद्धीने करण्यात आली असल्याचेही, त्यांनी म्हटले.

एवढेच नाही तर, या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी एक धक्कादायक खुलासा देखील केला. सुशांत सिंग राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियानचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजूनही आलेला नाही. दिशा ज्या दिवशी बिल्डिंग वरून खाली पडली, त्यादिवशी त्या अपार्टमेंटमध्ये कोण-कोण आलं होतं? त्या दिवशीच्या रजिस्टरमधील पाने फाडलेली आहेत? याचा अर्थ सगळ्यांना माहीत आहे. या प्रकरणासंदर्भात मातोश्रीच्या चौघांना केंद्रीय यंत्रणांकडून लवकरच नोटीस पाठवली जाणार असल्याचा,धक्कादायक खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.

दिशा सालियानची हत्या का आणि कोणी केली आहे? यासंदर्भात सुशांत सिंग राजपूतला माहित होतं. आपण तुम्हाला सोडणार नाही, असं त्याने म्हटलं होतं, आणि म्हणूनच सुशांत सिंग राजपूत यांची हत्या करण्यात आली. असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. एवढंच नाही तर, या प्रकरणात आता लवकरच केंद्रीय यंत्रणा मातोश्रीवरील चौघांना नोटीस पाठवणार असल्याचं देखील नारायण राणे म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.