‘या’ लोकांचे सोमय्यांनी सात हजार कोटी गोळा केले अन्…”; पोलीसांच्या कारवाईने सोमय्यांच्या हालचाली वाढल्या

0

काही दिवसांपासून संजय राऊत भारतीय जनता पार्टी, खासकरून ‘किरीट सोमय्या’ यांच्यावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा दलाल आणि भडवा असा उल्लेख केला होता. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली साडेसात हजार कोटी गोळा केल्याचा आरोप केला.

भाजपचा दलाल किरीट सोमय्या यांनी पवई पेरूबाग येथील तब्बल ११० एकर जमीनीत ४३३ बोगस लोकांना घूसवण्याचं काम केलं. या बोगस लोकांकडून प्रत्येकी २५ लाख रुपये घेण्याचं काम या किरीट सोमय्या यांनी केले. पवईचेच जे या जमिनीचे मूळ, हकदार आहेत, ते आता माझ्याकडे आले आहेत. सोमय्या यांच्या विरोधातल्या २११ केसेस माझ्याकडे आल्या असून, त्याचे ट्रक भरून पुरावेही माझ्याकडे आहेत. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

खासदार संजय राऊत किरीट सोमय्या यांच्यामागे, आता चांगलेच हात धुऊन लागले आहेत. संजय राऊत सोमय्या यांच्या विरोधात आता अधिक आक्रमक झाले असून, रोज नवनवीन खुलासे करीत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत सोमय्यांचे कपडे काढून लोकं जोड्याने मारतील आणि धिंड काढतील, तुम्ही पहा. किरीट सोमय्या यांना मदत करणाऱ्या भाजपच्या इतर नेत्यांना देखील मी आव्हान करतो, या प्रकरणात तुम्ही पडू नका, आमचं आम्ही बघून घेऊ, नाहीतर तुम्ही देखील उघड पडाल, आणि लोकं तुमचे देखील कपडे काढण्याचं काम करतील. असंही संजय राऊत चंद्रकांत पाटील यांना म्हणाले.

फडणवीस अमित शहा यांच्या नावाने किरीट सोमय्या खंडणी गोळा करण्याचं काम करत आहे. गेल्या तीन-चार वर्षात किरीट सोमय्या यांनी जवळपास साडे सात हजार कोटी गोळा केले, असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना केला. देवेंद्र फडणवीस यांना याबाबत काही कल्पना असेल असं, मला वाटत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हा दलाल महाराष्ट्राला लुटायचे काम करत होता, असंही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाआयटीत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला, असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाआयटी घोटाळ्यातील आरोपी असणारा अमोल काळे याला कोणी पळवून लावलं? असा गंभीर सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी नंतर आता अमोल काळे देखील देश सोडून पळाला असल्याची माहिती आहे. अमित शहा यांना पत्र लिहून संजय काळे कुठे आहे? याबाबत मी विचारणा करणार असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Thackeray Sarkar/Police ONE more Case against Me for visiting Ministry Chhagan Bhujabal’s BENAMI Property

सांताक्रुझ येथील छगन भुजबळ यांच्या नऊ मजली बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर   मुंबई पोलीसांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोटीस पाठवली आहे. पंधरा दिवसात छगन भुजबळ यांनी जर यासंदर्भात खुलासा केला नाही तर, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करतील असे देखील पोलिसांनी नोटीसद्वारे म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.