कोल्हेंच्या नौटंकीवर ‘आढळरावां’नी केलेल्या ‘या’ विधानाने राजकारण तापले; कोल्हे म्हणाले..,”

0

खेडमधील दावडी लिंबगाव याठिकाणी खंडोबा घाटात काल बुधवारी बैलगाडा शर्यत पार पडली. बैलगाडा शर्यत सुरू असताना शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे अमोल कोल्हे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द मी पूर्ण केला असल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नसून, त्यांच्यात हिम्मत नाही. आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असल्याने आता दोघांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमोल कोल्हे यांनी “जेव्हा कधी बैलगाडी शर्यत सुरू होईल, तेव्हा पहिल्या बारीच्या मोर्र हा तुमचा पट्ट्या घोडी स्वार करेन” असा शब्द शिरूर मतदारसंघातील जनतेला दिला होता. अटी आणि काही शर्ती घालत न्यायालयाने बैलगाडी शर्यत करण्यास परवानगी दिली. बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना आढळराव पाटील यांनी आव्हान दिलं होतं.

यापूर्वी लांडेवाडी,नानोली, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाड्या शर्यत सुरू झाल्या. लांडेवाडी या ठिकाणी झालेल्या बैलगाडा शर्यतीत त्यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचे आव्हान दिले आढळराव पाटील यांनी दिले होते. मात्र अमोल कोल्हे यांनी मी दिलेले आव्हान स्वीकारले नसून, दावडी लिंबगाव याठिकाणी निम्मी यात्रा घरी गेल्यानंतर, निम्मी बैलगाडा शर्यत पार पडल्यानंतर, त्यांनी घोडीवर बसून घोडीस्वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घोडीला आमचे बैल देखील ऐकले नाहीत.

अमोल कोल्हे यांनी आणलेली ही घोडी मालिका, सिनेमात वापरणारी घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नसून, त्यांनी ती पुण्याहून आणली होती. त्यांनी पहिल्या बारीच्या पुढे माझी घोडी धावणार असा शब्द दिला होता. मात्र त्यांची घोडी बैलाच्याही पाठीमागे राहिली. तरीदेखील ते आपण दिलेला शब्द पुर्ण केल्याच्या खोट्या वल्गना करत आहेत. वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये माझं आव्हान स्वीकारण्याची हिम्मत नाही. असा जोरदार हल्ला आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर चढवला.

आढळराव पाटील पुढे म्हणाले, घोडीवर कसं बसतात, हे शेतकऱ्यांना आणि लोकांना चांगलच माहीत आहे. पहिल्या बारीच्या पुढे घोडी कशी धावते, हे शेतकऱ्यांना आणि बैलगाडी शर्यत तज्ञांना माहीत आहे. मात्र कोल्हे यांनी आणलेली घोडी ही बैलगाडीच्या पुढे धावणारी घोडी नव्हती. हे बहादर घोडीवर बसले, घोडीवर बसल्यानंतर घोडी राहिली मागे, आणि बैले गेली पुढे. आढळराव पाटील यांनी केलेल्या या आरोपांमुळे आता दोन्हीं आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहेत.

खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र आढळराव-पाटील यांच्या आरोपाला उत्तर देणं टाळलं असून त्यांनी ट्विटरवर एक वीट करत म्हटले आहे, “शब्दपूर्ती….! बैलगाडा शर्यत सुरू करण्याची अन् घाटात घोडीवर धरण्याचीही पारंपरिक इतिहास असलेल्या, निमगाव खंडोबाच्या यात्रेत आज खंडोबाचे दर्शन घेतले. आणि घाटात घोडीही धरली आणि भंडाराही उधळला”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.