व्हिडिओ: ‘दिल्ली’ने अर्जुन तेंडुलकरची किंमत दहा लाखांनी वाढवली, अन् अंबानी हसायला लागला..
नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२२ साठीच्या मेगा अॉक्शनध्ये अनेक रंजक गोष्टी घडल्या. आयपीएल २०२२मध्ये एकूण दहा संघ एकमेकांविरोधात लढणार आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ खेळणार असल्याने, काही महत्त्वाच्या खेळाडूंची रक्कम वाढल्याचं पाहायला मिळालं. अनेक खेळाडूंना आश्चर्यकारक बोली लागल्याचंही दिसून आलं. तर काही दिग्गज खेळाडूंना खरेदीदारही मिळाला नाही.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या सुरेश रैनाला देखील कोणी खरीददार मिळाला नसल्याने, काल दिवसभर सुरेश रैना ट्विटरवर ट्रेन्ड करत होता. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन, अशा अनेक दिग्गज खेळाडूंना कोणीही खरीददार मिळाले नसल्याचे पाहायला मिळाले. एकीइकडे अनेक दिग्गज खेळाडूंना कोणी खरीदार मिळाला नसला तरी, दुसरीकडे मात्र आपल्या संघात स्थान न बनणाऱ्या खेळाडूंला देखील खरीददार मिळाल्याचे पहिला मिळाले.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी खरेदी केलं होतं. गेल्या हंगामात एकही सामना न खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला त्यांनी रिलीजही केलं. मात्र काल झालेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकरला पुन्हा खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज 20 लाख ठेवण्यात आली होती. तसं पाहायला गेलं तर, एवढे दिग्गज खेळाडू असताना, त्याबरोबरच अर्जुन तेंडुलकरचा खेळ पाहिल्यानंतर, त्याला कोणीही खरेदी करणार नाही. तरीदेखील बेस प्राईज वीस लाख असून, देखील अर्जुन तेंडुलकरचे दहा लाख कसे वाढले? याची खूप मोठी रंजक गोष्ट आहे.
आयपीएल 2022 चा लिलाव सुरू असताना जर आपण पाहिलं असेल,तर लक्षात येईल, लिलावकर्ता ज्यावेळेस नाव पुकारत होते, तेव्हा प्रत्येक वेळी दिल्लीचे मालक त्या खेळाडूला बोली लावताना पाहिला मिळत होते. प्रत्येक संघाचे मालक, हे प्रत्येक खेळाडूला आपल्या संघात घेऊ शकत नाहीत. या विषयी कोणाचंही दुमत असण्याचे कारण नाही. ऑक्शन टेबलवर बसण्यापूर्वीच प्रत्येक संघ आपापली स्ट्रॅटेजी ठरवून आलेला असतो. कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं, हे याचा अभ्यास ऑक्शन टेबलवर बसण्यापूर्वीच झालेला असतो. मात्र दिल्लीतचे मालक वेगळीच स्ट्रॅटेजी घेऊन ऑक्शन टेबलवर बसले होते.
लिलावकर्ता ज्यावेळी खेळाडूंचे नाव पुकारत होते, तेव्हा- तेव्हा दिल्लीच्या मालकांनी आणि व्यवस्थापकांनी त्या खेळाडूंवर बोली लावल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक खेळाडूला आपल्या संघात घेणं शक्य नाही, मात्र तरीदेखील ते असं का करत होते? असा अनेकांना प्रश्न पडला होता. प्रत्येक खेळाडूंवर बोली लावायची आणि त्याची किंमत वाढवायची म्हणजे, मग इतर संघाचे पैसे संपतील. ही स्ट्रॅटेजी घेऊन दिल्लीचे मालक आणि व्यवस्थापक अॉक्शन टेबलवर बसले होते.
प्रत्येक खेळाडूला बोली लावायची आणि त्याची किंमत वाढवायची. ज्या संघाला गरज आहे, तो संघ त्याला हवी तेवढी किंमत मोजून खरेदी करू शकतो. त्यामुळे विनाकारणच आपल्याला गरज नसताना देखील, त्या खेळाडूची किंमत वाढवत राहायची, ही स्ट्रॅटेजी दिल्ली घेऊन आली होती. इथपर्यंत ठिक होतं, मात्र त्यांनी जेव्हा अर्जुन तेंडुलकरची देखील रक्कम वाढवली, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
अॉक्शन टेबलवर अर्जुन तेंडुलकरच नाव घेतलं, अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज वीस लाख रुपये होती. अर्जुन तेंडुलकरला खरेदीदारच मिळणार नाही, असे चित्र असताना मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला बेस प्राईजमध्ये खरेदी करायचं ठरवलं, आणि बोली लावली. मात्र मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकर बोली लावली आहे, हे पाहून दिल्लीच्या मालकांनी देखील अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली, आणि 20 लाखाचे 25 लाख रुपये केले.
दिल्लीच्या मालकांनी अर्जुन तेंडुलकरवर देखील बोली लावली आहे, हे पाहून आकाश अंबानीलाही हसू आवरलं नाही. अंबानी शेजारी बसणारा जाहीर खान देखील दिल्ली मालकांच्या या निर्णयावर हसू लागला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच वायरल झाला असून, सचिन तेंडुलकरच्या मुलाचा हा अपमान झाला आहे. असं अनेकांनी म्हटलं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम