दहावी पास विद्यार्थ्यांसाठी बंपर ऑफर; हवाई दलाच्या तब्बल ‘एवढ्या’ जागा, परिक्षेशिवाय होणार निवड

0

देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने सरकारवर बेरोजगारीच्या मुद्यावरून हल्लाबोल करताना दिसत आहेत. मात्र मात्र सरकार याबाबत गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता नोकरी मिळत नसल्याने देशातला तरुण देखील मोठ्या प्रमाणात संतापल्याचे चित्र आहे. रोजगाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी नोकरी संदर्भातील ही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

दहावी पास तरुणांसाठी ही नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय हवाई दलाने नाशिक जिल्ह्यातील ओझर याठीकाणी तांत्रिक ट्रेडच्या म्हणजेच, अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाच्या ८० जागांची अधिसूचना काढण्यात आली आहे. या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून भरण्याची शेवटची मुदत ही 19 फेब्रुवारी २०२२ पर्यंत असणार आहे.

भारतीय हवाई दलात अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाच्या ८० जागांसाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी पात्र राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती असली तरी याच्यातही एक अट आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाचे गुण हे 50 टक्‍क्‍यांहून अधिक असणे बंधनकारक आहे. तरच या भरतीसाठी आपण पात्र असणार आहे. त्यासोबतच आयटीआयचे 65% टक्यांचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी निवडण्यात येणाऱ्या 80 जागांसाठी वयोमर्यादा देखील ठेवण्यात आलेली आहे. १ एप्रिल रोजी रोजी उमेदवाराचे वय हे 14 ते २१ वर्ष असणं आवश्यक आहे. इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांची सवलत देखील देण्यात आली आहे. त्याबरोबरच अनुसुचित जाती जमातींसाठी पाच वर्षाची सूट असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिमहिना पगार सात हजार 700 रुपये मिळणार आहे.

विविध पदांसाठी निवडण्यात येणारी पदे 

१) मशिनिस्ट/ Machinist – ०४ पदे

२) कारपेंटर/ Carpenter ०३

३)) पेंटर जनरल/ Painter General – ०१ पदे

४) शीट मेटल/ Sheet Metal – ०७ पदे

५) फिटर/ Fitter – २६ पदे

६) इलेक्ट्रीशियन एअरक्राफ्ट/ Electrician Aircraft- २४ पदे

७)) मेकॅनिक(रेडिओ रडार एअरक्राफ्ट)/ Mechanic

८) (Radio Radar Aircraft) – ०९ पदे

९) वेल्डर(गॅस व इलेक्ट्री)/ Welder (Gas & Electric) ०६ पदे

निवड प्रक्रिया :

10वी/12वी/ITI आणि प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या परिक्षेसाठी अॉनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १९ फेब्रुवारी २०२२ ठेवण्यात आली आहे.

IAF शिकाऊ परीक्षेची तारीख ही – ०१ ते ०३ मार्च २०२२ अशी ठेवण्यात आली आहे.

IAF शिकाऊ उमेदवार निकालाची तारीख – १७ मार्च २०२२ अशी आहे. इंडियन एअर फोर्स अप्रेंटिस कोर्स हे ०१ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहोत.

          यावर क्लिक करून अर्ज करू शकता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.