दिल्लीने लॉर्ड ‘शार्दुल’ला एवढी मोठी रक्कम देऊन का खरेदी केलं? कारण जाणून तुम्हीही कराल मान्य
काल आयपीएल २०२२ साठीच्या मेगा अॉक्शनचा पहिला दिवस आश्र्चर्यकारक आणि दुःखदरित्या पार पडला. सकाळच्या सत्रात लिलावकर्ता ‘ह्यू एडमीड्स’ अचानक कोसळल्यामुळे काही वेळ हा अॉक्शन थांबवण्यात आला. मात्र नंतर सगळं ठीक असल्याचे समोर आल्यानंतर अॉक्शनला पुन्हा सुरुवात झाली. काल आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन नवख्या खेळाडूंना सर्वाधिक बोली लागल्याचे पाहायला मिळाले.
श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोन खेळाडूंना मोठी रक्कम मिळणार असल्याचे, अनेकांनी म्हटलं होतं. मात्र या व्यतिरिक्त तीन भारतीय गोलंदाजांना मिळालेली रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक भारतीय गोलंदाज या लिलावात मालामाल होऊ शकतात, असं अनेकांनी म्हटलं होत. मात्र एवढी मोठी रक्कम मिळेल असं, कोणालाही वाटल नव्हत. त्यातीलच एक नाव म्हणजे शार्दुल ठाकूर.
चेन्नई सुपर किंग या संघाकडून खेळताना फारसी चमकदार कामगिरी शार्दुलला करत आली नव्हती. मात्र भारतीय संघाकडून खेळताना त्याने भन्नाट कामगिरी केली. आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीचीही चुणूक त्याने दाखवली. अनेक सामन्यात त्याने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढत, अनेक सामनेही जिंकून दिले. यामुळे त्याला लॉर्ड शार्दुल हे नावही पडले. आणि याचाच फायदा त्याला आयपीएलमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.
चेन्नई सुपर किंग संघाने रिलिज केल्यानंतर शार्दुल ठाकूरला अनेक संघांनी बोली लावली. अनेक संघ लॉर्ड शार्दुलच्या मागे धावले. मात्र यात दिल्ली कॅपिटल संघाने बाजी मारली. आणि आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. शार्दुल ठाकूरला दिल्ली कॅपिटल संघाने तब्बल 10.75 कोटी रक्कम खर्च करून खरेदी केले. अनेकांनी शार्दुल ठाकूरला मिळालेली रक्कम थोडी जास्त झाली असल्याचे म्हटलं. अनेक जण जर शार्दुल ठाकूरला मिळालेली ही रक्कम जास्त झाली असं म्हणत, असतील तर मग त्याला एवढी रक्कम मोजून दिल्लीने का खरेदी केलं.
शार्दुल ठाकूर हा दिल्ली संघासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी अशी दुहेरी भूमिका बजावू शकतो, आणि म्हणून त्याला दिल्ली संघाने एवढी मोठी रक्कम मोजून खरेदी केल्याचं दिसत आहे. प्रत्येक संघाला ऑल राऊंडर खेळाडूंची गरज असते. ऑल राऊंडर खेळाडू हा प्रत्येक संघासाठी एक्स फॅक्टर ठरतो. एखाद्या वेळस जर गोलंदाजीत तो चमकला नाही, तर फलंदाजी करताना आपल्या संघाला तो जिंकून देऊ शकतो. आणि म्हणून अशा खेळाडूंची प्रत्येक संघाला आवश्यकता असते. कदाचित म्हणूनच शार्दुल ठाकूरला दिल्लीने एवढी मोठी रक्कम देऊन खरेदी केल्याचे पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम