‘इशान किशन’ला खरेदी करताना अंबानी मायलेकरांचा घाम निघाला; अॉक्शन टेबलवर काय घडलं? वाचा सविस्तर

0

आयपीएल २०२२ साठी मेगा ऑक्शन सुरू असून, आपल्या आवडत्या खेळाडूंना खरेदी आपापला संघ बोली करताना पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रात भारतीय संघाचा फलंदाज श्रेयश अय्यर सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. श्रेयश अय्यरला 12 कोटी 25 लाख रुपयांत कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलं. श्रेयश अय्यर हा आजच्या दिवसाचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरणार, असं वाटत असतानाच ईशान किशनने त्याचा रेकॉर्ड मोडला.

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघानी आतापर्यंत लिलावात आपली झलक दाखवली नव्हती. मात्र दुपारनंतर हे दोन संघ एकमेकांना भिडताना पाहायला मिळाले. विकेट किपर बॅट्समनची बोली सुरू असताना,  अनेक संघाचे मालक ईशान किशनला आपल्या सांगात घेण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. इतर संंघांच्या तुलनेत या दोन्हीं संंघाकडे अधिक पैसे असल्याने, दोघांव्यतिरिक्त ईशान किशनला कोणीही खरेदी करू शकणार नाही असं चित्र होतं.

ईशान किशन यापुर्वी मुंबई इंडियन्स संघात होता. दोन कोटी रुपये ही त्याची बेस प्राइज होती. मात्र मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केलं.  ईशान किशन खूप महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती. मुंबई इंडियन्स ईशान किशनच्या पाठीमागे धावू शकते. आणि मोठी रक्कम मोजू शकते, असंही बोललं जात होतं. मात्र एवढ्या मोठी रक्कम देऊन, ईशान किशनला घ्यावं लागेल, असं मुंबई इंडियन्सला कधीही वाटलं नसेल.

सनरायझर्स हैदराबादकडे मुंबई इंडियन्स संघापेक्षाही अधिक पैसे असल्यामुळे, नीता अंबानी आकाश अंबानी चिंतेत पाहायला मिळत होते. ईशान किशनची बोली लागल्यानंतर अनेक संघांनी ईशान किशनला बोली लावायला सुरुवात केली. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघात चढाओढ लागली. ईशान किशनची बोली दहा कोटींवर पोहचल्यानंतर मुंबई इंडियन्स समोर किंग्स इलेव्हन पंजाबने गुडघे टेकले. आणि माघार घेतली.

 

किंग्ज इलेव्हन पंजाबने माघार घेतल्यानंतर, ईशान किशनला सनराईजर हैदराबादने बोली लावली. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये ईशान किशनला घेण्यासाठी चढाओढ लागली. सनरायझर्स हैदराबादकडे अधिक पैसे असल्याने, आता ईशान किशन हा मुंबई इंडियन्सच्या हातातून सुटणार आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळताना पाहायला मिळणार असं वाटू लागलं. मात्र नीता अंबानी आकाश अंबानी हार मानायला तयार नव्हते. ईशान किशनला त्यांना आपल्याच संघात खेळताना पाहायचं होतं.

ईशान किशनची बोली तब्बल 15 कोटी आणि पंचवीस लाख रुपयांपर्यंत पोचली. तरीदेखील अंबानी मागे हटायला तयार नाहीत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकांनी बोलीतून आपली माघार घेतली. ईशान किशन मुंबई संघाकडेच राहिला. आकाश अंबानी आणि नीता अंबानी या दोघांनी ईशान किशन साठीच इतर संघाच्या तुलनेत आपली रक्कम राखून ठेवली होती. हे ईशान किशनच्या बोलीवरून स्पष्ट होताना पाहिला मिळालं.

ईशान किसनला आपल्याच संघात ठेवण्यास नीता अंबानी आकाश अंबानींना यश आलं. आपला आवडता खेळाडू आपण पुन्हा आपल्याच संघात घेऊ शकलो. याचा आनंद या दोघांनाही झाल्याचं ऑक्शन टेबलवर पाहायला मिळालं. ईशान किशनला खरेदी केल्यानंतर या दोघांनी एक प्रकारे आनंद साजरा केल्याचही दिसून आलं. आपल्या मुंबई इंडियन्स संघाकडून पुन्हा एकदा फटकेबाजी करता येईल, त्यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला जलवा दाखवता येणार असल्याने, तो देखील खुश असल्याचं बोललं जातंय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.