श्रेयस अय्यरला सर्वाधिक बोली; ‘या’ संघाने मोजले तब्बल ‘एवढे’ कोटी

0

IPL 2022 लिलावच्या या हंगामासाठी होणार्‍या मेगा लिलावाला सुरुवात झाली असून, अनेक खेळाडूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली ही श्रेयस अय्यरला लागली आहे. आयपीएल २०२२च्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये स्टेज तयार आला असून, याकडे अनेक खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.

दिल्ली कॅपिटलचा माजी कर्णधार श्रेयश अय्यरला या हंगामात सर्वाधिक बोली लागणार असल्याचं अनेकांकडून बोलण्यात येतं होतं. श्रेयश अय्यर कर्णधार म्हणून देखील आपली भूमिका बजावू शकतो, आणि म्हणून अनेक संघ त्याच्यावर निवेश  करताना पाहायला मिळणार असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती. दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन वेळा नेतृत्व करत आपली चुणूक दाखवली होती. ‘श्रेयस अय्यर’च्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल संघाने जबरदस्त कामगिरी केली होती.

‘मिडल ऑर्डर’मध्ये एक तगडा बॅट्समन आणि महेंद्रसिंग धोनी सारखा कुल समजला जाणारा श्रेयश अय्यर, हा आपल्या संघासाठी दुहेरी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकतो. त्यामुळे अनेक संघाची चढाओढ श्रेयस अय्यरला आपल्या संघात घेताना दिसून येणारं असल्याचं बोललं जात होतं. आणि आजच्या लिलावात झालंही तसंच. श्रेयस अय्यरला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक संघांनी उत्सुकता दाखवली. दिल्ली, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, याांसह अनेक संघांनी श्रेयसला घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. मात्र अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली.

 

श्रेयस अय्यरला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्बल १२ कोटी २५ लाख रुपये मोजले. श्रेयस अय्यरला आपल्या संघात घेतल्यामुळे, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान खुश झाल्याचे पाहायला मिळाले. आता श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवा कर्णधार असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी, त्यांच्याकडे दुस-या कॅप्टनचा पर्यान नसल्यामुळेच त्यांनी श्रेयस अय्यरला आपल्या संघात घेतले असल्याचं स्पष्ट होते. पॅट कमिन्सला मात्र यावेळेस गेल्या हंगामाच्या तुलनेत निम्म्या किमतीवरच समाधान मानावे लागले आहे. आज आणि उद्या या दोन दिवसांत तब्बल ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात २२७ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.