वाह मोदीजी वाह…! अडाणी आणि अंबानींची अनेकांनी पुजा केली पाहिजे

0

एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मात्र केंद्रीय मंत्र्यांकडून बेरोजगार तरुणांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. हिवाळी अधिवेश सुरू असताना, गृहमंत्रालयाने बेरोजगारीमुळे १० हजार तरुणांनी आत्महत्या केल्या असल्याचा रिपोर्ट संसदेत सादर केला. हे कमी की काय म्हणून, भाजपच्या एका खासदाने बेरोजगार तरुणांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं बालिश विधान केलं आहे.

विरोधक सरकारला बेरोजगारी या मुद्द्यावर सातत्याने घेरताना पाहायला मिळत आहे. मात्र सरकारकडून यासंदर्भात काही ठोस पावले उचलली जात नसल्याचंही दिसून येत आहे. याउलट सरकारचे काही मंत्री बेरोजगारी या मुद्द्यावरून गंभीर नसल्याचे देखील समोर येताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यसभेत भाजपच्या एका राज्यसभा खासदारने अडाणी आणि अंबानी या लोकांची तुम्ही पूजा केली पाहिजे,असे धक्कादायक विधान केले आहे.

विरोधकांकडून सातत्याने अडाणी आणि अंबानी या दोनच व्यक्तीचा विकास झाला. या दोघांच्याच उत्पन्नात वाढ झाली. दोघांव्यतिरिक्त देशात कोणाचाही विकास झाला नाही. कोणाच्याही संपत्तीत वाढ झाली नाही, याउलट ८४ टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली. ४.६ कोटी लोक प्रचंड गरीब झाले, असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भातला अहवाल देखील विरोधकांनी दिला आहे.

एकीकडे बेरोजगारीची भयाण परिस्थिती असली तरी, दुसरीकडे मात्र सरकार मधील खासदार याविषयी गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यसभेत ‘केजे अल्फोन्स’ या भाजपा खासदाराने चक्क अडाणी आणि अंबानीची पूजा केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. केजे अल्फोन्स’ म्हणाले, अडाणी, अंबानी या लोकांची तुम्ही पूजा केली पाहिजे. कारण ही लोकं रोजगार निर्माण करतात. यांच्यामुळे अनेकांना रोजगार निर्माण होतो. आणि म्हणून या लोकांची पूजा करण्याचा सल्ला, या महाशयाने विरोधकांना दिला.

भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांची आणि काही खासदारांची असं बरळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीदेखील अनेक मंत्री काहीही बरळल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहिला मिळालं आहे. दोन दिवसापूर्वीच कर्नाटकचे भाजपाचे आमदार एम.पी. रेणुकाचार्य यांनी महिलांच्या पोषाखामुळेच बलात्कार होतात, असं वादग्रस्त विधान केलं होतं. फक्त मंत्रीच नाही तर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशात कोरोना हा काँग्रेसमुळेच पसरला, असं धक्कादायक विधान संसदेत केलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.