‘मुस्कान’ने ‘जय श्रीराम’ला ‘अल्लाहू अकबर’नेच का प्रतिउत्तर दिले? स्वतःतीनेच केला धक्कादायक खुलासा…

0

कर्नाटक राज्यामधील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर या ठिकाणच्या एका खाजगी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या सहा मुस्लिम मुलींनी प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश नाकारल्याने या मुलींनी न्यायालयात धाव घेतली, आणि आता या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सहा मुस्लिम मुलींना प्रतिउत्तर म्हणून सहा मुलांनीही चिखमंगलूर या ठिकाणी भगवे शेले घातले. आणि तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे.

हिजाब आणि भगवे शेले हा वाद आता कर्नाटकचा इतर जिल्ह्यात, महाविद्यालयात देखील पाहायला मिळत असून, विद्यार्थी मोठ्याप्रमाणात भगवे शेले घालून हिजाब या प्रकरणाचा जोरदार विरोध करताना पहायला मिळत आहेत. कर्नाटकच्या ‘मांडया’मध्ये दोन दिवसांपूर्वी मुस्कान खान नावाच्या एका मुस्लिम तरुणीचा कॉलेजमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

भगवे शेले गळ्यात घालून तीस-चाळीस जणांचा घोळका त्या तरुणीला जय श्रीराम-जय-श्रीराम नावाच्या घोषणा देत असताना पहिल्या मिळत होतं. ती तरुणी देखील प्रतिउत्तर म्हणून ‘अल्लाहू अकबर’ म्हणताना पाहायला मिळाली होती. आता त्या तरुणीने ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा का दिल्या? त्याविषयी सोशल मीडियावर अनेक वादविवाद पाहायला मिळाले. अनेक जणांनी म्हटलं, तिकडून जय श्रीराम नावाचा घोषणा येत होत्या तर तिने अल्लाहू अकबर नावाच्या घोषणा का दिल्या?

जर या तरुणीने जय श्रीराम नावाच्या घोषणा देणाऱ्या तीस-चाळीस तरुणांना “भारत माता की जय”या घोषणांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं असतं तर, अनेकांनी तीचं स्वागत केलं असतं. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्याचे पाहायला मिळाले. तर काहींनी या मुलीचं कौतुक देखील केलं. समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या असताना या मुलीला घेरण्याचा प्रयत्न करत असून देखील, मुस्कान घाबरली नाही, आणि समोरच्या तिस-चाळीस जणांच्या उन्मादाचा सामना केला. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून उमटल्याचही दिसलं.

मात्र या प्रकारावर ‘मुस्कान’ने ‘बीबीसी न्यूज’ला बोलताना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे, मुस्कान म्हणते हा तरुणांचा घोळका गेटच्या बाहेरच उभा होता. कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असेल तर, हिजाब काढूनच प्रवेश करावा लागेल. नाहीतर तूला इथूनच घरी जावं लागेल. असं ते मला म्हणत होते. मात्र मी त्यांना घाबरली नाही. आणि गेटमधून आत प्रवेश केला. मी गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी जय श्रीराम नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, आणि मला घेरण्याचा प्रयत्न करायला लागली.

जय श्रीराम नावाच्या घोषणा देत मला घेण्याचा प्रयत्न करायला लागल्यामुळे, मी घाबरले. आणि मग त्यांना प्रत्युत्तर म्हणून मी देखील ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देऊ लागले. जेव्हा मला भीती वाटते, तेव्‍हा मी ‘अल्लाहू अकबर’ म्हणते. मी जर अल्लाहू अकबर म्हणाले तर मला भीती वाटत नाही. आणि म्हणून त्यावेळी मी अशा घोषणा दिल्या. असं मुस्कान खानने बीबीसी न्यूजला बोलताना म्हटले आहे.

समोर खूप मोठी गर्दी असताना देखील तु त्यांचा सामना केल्यामुळे सोशल मीडियावर तुझं फार मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय? या प्रश्नाला उत्तर देताना मुस्कान खान म्हणाली, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते. न्यायालयाचा निर्णय तुमच्या विरुद्ध गेला तर? या प्रश्नाला उत्तर देताना मुस्कान म्हणाली, संविधानावर आमचा विश्वास आहे, न्यायालयाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल, आम्हाला विश्वास आहे, न्यायालय धर्माविरुद्ध जाऊन निर्णय देणार नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.