एका एकरात दोन कोटीची विहीर बहाद्दराने कशी आणि का बांधली? जाणून जाल चक्रावून..
शेतकऱ्यांच्या मनात आले तर, शेतकरी काहीही करू शकतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये एका शेतकऱ्याचा महिंद्रा शोरूनच्या कर्मचाऱ्याने अपमान केला, आणि म्हणून, या शेतकऱ्याने काही वेळातच दहा लाख रुपये त्याच्या टेबलावर ठेवल्याची बातमी आपण पाहिलीच असेल. बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी या गावातील असंच एका शेतकरी बहाद्दराने केलेला कारनामा ऐकून तुम्हाला वेढ लागेल.
बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी या गावातील एका अवलिया शेतकऱ्याने पाण्याची वारंवार कमतरता भासत असल्याने, बहाद्दराने चक्क एका एकरात विहीर बांधण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. दहा कोटी लिटर पाणी क्षमता असणारी ही विहीर चर्चेचा विषय बनली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी या गावातील मारोतीराव नारायण बजगुडे असं या अवलिया शेतकऱ्यांचे नाव आहे.
मारोतीराव नारायण बजगुडे यांना एकूण बारा एकर शेती आहे. शेती बरोबर त्यांचा मंडपाचा व्यवसाय देखील आहे. शेतीला पाण्याची कमतरता वारंवार भासत असल्यामुळे, एका एकरमध्ये विहीर बांधण्याचा हा निर्णय घ्यावा लागला. १० कोटी लीटर पाण्याची क्षमता असणारी ही विहीर आता ओसंडून वाहत आहे. ही विहीर बांधण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च आल्याचे या शेतकऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
हे वाचा ‘या’ कारणामुळे महाराष्ट्रातला कांदा दर्जेदार असूनही भाव नाही; केंद्र सरकारच्या…
एका एकराच्या पसाऱ्यात विहीर आणि तिही साडेपाच परस खोल कसं शक्य आहे? हा अनेकांना प्रश्न पडला असेल, मात्र या शेतकऱ्याने हा कारनामा करून दाखवला आहे. मारोतीराव बजगुडे या शेतकऱ्याने तीन वर्षांपूर्वी ही विहीर बांधायला सुरुवात केली होती. सुरुवातीला एक एकर क्षेत्रात खोदकाम सुरू झालं, या खोदकामातून निघणारा मुरूम त्यानी महामार्गाला विकला, त्यातून त्यांना 20 ते 25 लाख रुपये मिळाले. दोन परस खोल गेल्यानंतर, संपूर्ण क्षेत्राला पाशाण लागला. पाशाण लागल्यानंतर तो जिलेटिंगच्या सहाय्याने फोडून काढला.
गेल्या सहा महिन्यांपासून या विहीरीचं काम अधिक जोमाने सुरू झालं, सहा महिन्यांच्या कामाचा लेखाजोखा पाहिला तर प्रत्येक जण चक्रावून जाईल. सहा महिने तब्बल ऐंशी मजूर दररोज कामावर होते. बारा हायवा, आठ जेसीबी गेल्या सहा महिन्यांपासून काम करत होत्या, अशी माहिती या शेतकऱ्याने दिली आहे. आता या विहीरीचे काम पूर्ण झाले असून, चहुबाजूंनी रिंग टाकण्यात आली आहे. या विहीरीमध्ये दोन बोर देखील घेण्यात आलेली आहेत. दोन वर्ष दुष्काळ पडला तरीदेखील, पन्नास एकर जमीन या विहीरीच्या पाण्यातून ओलिताखाली येणार असल्याचं समोर आलं आहे.
हे वाचा- लग्नाची वरात चक्क हार्वेस्टर वरून काढली; शेतकऱ्याचा नादच खुळा, व्हिडिओ व्हायरल
दहा कोटी लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या या विहिरीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळत आहे. अनेक जण विहीरीसोबत सेल्फी काढून जात, असल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे. दुष्काळ हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेती असून देखील, दुष्काळामुळे पाहिजे तेवढे उत्पन्न शेतीमधून मिळत नाही. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी या शेतकऱ्याने एका एकर क्षेत्रात पाडलेल्या विहिरीमुळे त्याचे प्रचंड कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम