कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच थेरेगाव’क्वीन’ची आता वेगळीच थेरं; पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल

0

सोशल मीडियाचा वापर हा दुधारी तलवारीसारखा असल्याचे प्रत्येकजण मान्य करेल. अलीकडच्या काळात प्रत्येकाला प्रसिद्धी मिळवण्याचं जणू काही वेढच लागल्याचं दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून असंख्य लोक सोशल मीडियाचा वापर करू लागले. भारतात टीक-टॉक बंद झाल्यानंतर इन्स्टाग्रामने टिक-टॉक सारखे फीचर ‘रिल्स’ म्हणून मार्केटमध्ये आणलं. आणि त्याच्या वापरकर्त्यांची संख्याही प्रचंड वाढली.

इंस्टाग्रामवर रिल्स बनवून आपल्या रिल्सला व्ह्यूज मिळवण्यासाठी ही मंडळी कोणत्याही धरला जायला लागली. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केल्यास आपल्या रिल्सला लाईक, view मिळतोय ही गोष्ट या दीड शहण्याचा मनात घट्ट बसल्याने ही शहाणी काहीही कंटेंट बनवायला लागली. काहीही बनवल्याने आपल्या हातून क्राईम देखील होऊ शकतो, याचा विसर देखील या मंडळींना पडल्याचे पाहायला मिळत आहे.

अशीच एक स्वयंघोषित ‘थेरेगाव क्वीन’ची कहाणी तुम्हाला माहीतच असेल. थेरेगाव क्वीन नावाने इंस्टाग्राम आयडी काढून पिंपरी चिंचवड मधील थेरगावच्या एका अठरा वर्षाच्या पोरीने कहरच केल्याचे आपण पाहिलेच असेल. आपल्याला प्रसिद्धी मिळावी, आणि आपले फॉलोवर्स वाढावे यासाठी ही अल्पवयीन पोरगी रिल्स बनवताना व्हिडिओत चक्क शिव्या देताना दिसून येत आहे.

या पोरीच्या शिव्या म्हणजे, एखाद्याच्या कानातून रक्तच येईल. विशेष म्हणजे या पोरीच्या या घाणरड्या वर्तणूकीबाबद शिव्या देणाऱ्या व्हिडिओवर अनेकांनी तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी देखील या पोरीवर कारवाई करण्याचे आदेश दिले‌. वाकड पोलिसांनी या पोरीला अटक देखील केली. ही मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला समज देऊन सोडले, पोलिसांची या पोरीने माफीही मागितली.

मात्र पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यावर या स्वंयघोषित ‘थेरेगाव क्वीन’ची ‘थेरं’ काही कमी झाली नाहीत. समज देऊन पोलीसांनी सोडलं खरं, परंतु या पोरीने चक्क पोलिसांनाच चॅलेंज करणारा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. थेरगाव क्लीन या नावाने इंस्टाग्राम सुरू करणाऱ्या पोरीचं नाव ‘साक्षी श्रीमल’ असं आहे. वाकड पोलिसांनी 30 जानेवारीला या पोरीला अटक केली होती. अटक केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. आणि आता तोच व्हिडिओ या पोरीनं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अटक केलेला हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत, त्याला गजब बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे. ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्याला कितीही काहीही करा ते काही सरळ होणार नाही. या म्हणीप्रमाणे या पोरीची थेरं देखील अशीच आहेत. यात काही बदल होताना पाहायला मिळत नसून, हीने अजूनही आपली थेरं सुरुच ठेवली आहेत.

पोलिसांच्या अटकेतून सुटल्यानंतर साक्षी श्रीमल हीच जंगी स्वागत करण्यात आले होते. जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर अनेकांनी हिची मस्ती अजूनही जिरली नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी या पोरीन पुन्हा आपल्या इंस्टाग्रामवर पोलिसांनी अटक केलेला व्हिडिओ पोस्ट केला. “मोठी हस्ती आहे आपण, तीनपाट थोडी आहे. ढगात आहे ना आपण, खालून कितीही दगडं मारु द्या, आपल्यापर्यंत येत नाहीत, भाऊ कोणाची दगडं” असं त्याला कॅप्शनही दिलं.

पोलिसांनी अटक केलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर या पोरीनं आता एक नवीन वादग्रस्त व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओत देखील शिव्यांचा मारा करण्यात आला आहे. स्व:ताला थेरेगाव क्वीन समजणारी ही पोरगी या व्हिडीओत म्हणत आहे, वयाने लहान आहे, डोक्याने नाही. विकून खाईन, किरकोळ नको समजू..! कळलं का ****त अशी गलिच्छ भाषेतला व्हीडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

कोरोणामुळे ऑनलाइन शिक्षण झाल्याने, मुलांना पालकांनी मोबाईल घेऊन दिले. मोबाईलचा वापर हा ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी करायचा, हा उद्देश होता. मात्र मोबाईलमुळे पोरं भलतीकडेच वळल्याची पाहायला मिळाली. दहावी आणि बारावीचे पेपर ऑफलाइन नको, ऑनलाइन घ्या, म्हणून पोरं रस्त्यावर उतरली. कोणाच्या सांगण्यावरून, तर वादग्रस्त विधान करून शिवीगाळ करून, सोशल मीडियावर फेमस झालेल्या ‘पाठक’च्या.

80 मार्काच्या पेपरमध्ये आम्हाला 20 मार्काचं देखील येत नाही, आणि म्हणून पेपर ऑफलाइन नको ऑनलाईन घ्या, असं वक्तव्य करणारी पोर देखील आपल्याला पाहायला मिळाली. सोशल मीडियाच्या या जमान्यात विद्यार्थांना, पोरांना शिस्त लावणं, अलीकडच्या काळात पालकांसमोर, शिक्षकांसमोर,आणि सरकारसमोर देखील खूप मोठे आव्हान उभं राहिले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.