बालिशपणाचा कळस..! ‘लॉकडाऊनम’ध्ये पायी प्रवास करणाऱ्या मजूरांविषयी मोदी हे काय बोलले…

0

अर्थसंकल्पीय अधिवेशनात नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू आहे. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टिका करत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, त्या संदर्भात नरेंद्र मोदी बोलत असताना, नरेंद्र मोदी यांनी या भाषणात काँग्रेसला टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने पन्नास वर्षे देशावर राज्य करून देखील, अनेक राज्यात अनेक दशकं झाली त्यांची सत्ता आला नाही. असा घणाघात त्यांशी केला आहे.

या बरोबरच नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणखी एक गंभीर आणि बालिश आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. देशातून रुग्ण संख्या वाढत असताना ३१ मार्च २०२०ला आम्ही जेव्हा प्रथम लॉकडाऊन केलं, तेव्हा त्याचा उद्देश हा जो जिथे आहे तिथेच त्याने थांबावं, म्हणजे कोरोना वाढणार नाही, हे त्याचा उद्देश होता. मात्र काँग्रेसने देशाविरुद्ध काम केलं, उत्तर प्रदेश बिहारच्या मंजूरांना त्यांनी सांगितले, जावा महाराष्ट्रातून ओझं कमी करा. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोना वाढवा. असे धक्कादायक विधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलं आहे.

31 मार्चला कोणत्याही सुचने शिवाय नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. उत्तर प्रदेश बिहारचे हजारो मजूर मुंबई पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात कामानिमित्त स्थलांतरित असल्याची आकडेवारी आहे. लॉकडाऊन झाल्याने हे मजूर आपापल्या घरी निघाले. जायला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने, वाहतूक यंत्रणा बंद झाल्यामुळे या मजूरांचे प्रचंड हाल झाले. उत्तर प्रदेश बिहार राज्यातले मजूर पायी प्रवास करत आपल्या गावाकडे चालत निघाल्याची अनेक भयान दृश्य पाहायला मिळाली.

हजारो मजूर पायी प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने विशेष ट्रेनमधून या मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्याचं काम केलं. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सरकार असल्याने नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे महाराष्ट्र सरकारवर टीका केली. या टीकेत त्यांचा रोष काँग्रेसकडे असल्याचं जाणवत होतं. काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मजूर सोडले, आणि कोरोना वाढवण्याचं काम केलं. असल्याचा धक्कादायक विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन भाषणात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आपला निशाणा बनवला. कॉंग्रेसने देशावर पन्नास वर्षे राज्य केलं,मात्र देशातल्‍या अनेक राज्‍यात काँग्रेसची दोन दशकापासून सत्ता आली नाही. असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केली. यात त्यांनी, ओडिसात तुम्हाला १९९५ साली बहुमत दिले होते, त्यानंतर अजूनही तुम्हाला सत्ता मिळाली नाही. तेलंगणा राज्य वेगळे केल्याचं श्रेय तुम्ही घेता, मात्र अजूनही तिथे तुम्हाला सत्ता स्थापन करता आली नाही.

एवढंच नाही तर त्रिपुरात तुम्हाला १९८८ला बहुमत मिळाले होते. झारखंड अस्तित्वात येऊन २० वर्षे झाली, अजून तुम्हाला सत्ता मिळाली नाही. आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला १९६२ नंतर अजूनही सत्ता मिळाली नाही. मुद्दा सत्ता मिळाल्याचा नाही तर लोकांनी तुम्हाला का नाकारले? हा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.