लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी शाहरुख ‘फाटलेला’च टी-शर्ट का घालून आला, कारण जाणून..

0

काल रविवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात भारताची गानकोकिळा म्हणून ओळखला जाणाऱ्या, लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि संपूर्ण देशावर शोककळा पसरली. एकीकडे संपूर्ण देश दुःखात असताना दुसरीकडे मात्र शाहरुख खानने लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र शाहरुख खानला थुंकला नसून, त्याने फुंकर मारली असल्याचं समोर आलं. आणि हे प्रकरण थोडं थंडावल्याचं पाहायला मिळाले. त्यातच आता शाहरुख खानच्या फाटलेल्या टी-शर्टची चर्चाही जोरदार रंगली आहे.

काल संध्याकाळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, शिवाजी पार्कवर, अनेक राजकीय कला, सांस्कृतीक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी पोहचली होती. त्यात शाहरुख खानला देखील होता. शाहरुख खानने मुस्लिम धर्माच्या पद्धतीने लता मंगेशकर यांचा अखेरचा निरोप घेतला.

शाहरुख आणि लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी,आणि स्वर्ग प्राप्ती व्हावी, यासाठी अल्लाकडे दुवा मागितली. त्यासोबतच त्याने आपल्या तोंडावरचा मास्क उतरवत फूंकर देखील मारली. मात्र सोशल मीडियावर फूंकर मारल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. आणि शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र नंतर याचे सत्य समोर आले. एकीकडे याची चर्चा होत असतानाच, आता शाहरुख खानच्या फाटलेल्या टी-शर्ट देखील जोरदार चर्चा रंगली आहे.

लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शाहरुख खान शिवाजी पार्कवर पोहचला. व्हाईट टी-शर्ट आणि अॉफ व्हाईट पॅन्ट असा पोशाख परिधान करून शाहरुख खान पोहचला होता. अशा दुःखद कार्यक्रमाला कोणी काय घातले याकडे फारसे कोणी पाहत नाही. किंवा याला काही महत्व नसते. परंतु काल शाहरुख खानने घातलेला टी-शर्ट चक्क फाटला होता. हे पाहून अनेकांना आश्र्चर्य वाटले.

शाहरुख खान लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी फाटलेला टी-शर्ट घालून आला, हे पाहून अनेकांना आश्र्चर्य वाटेल. मात्र हे खर आहे, शाहरुख चक्क फाटलेला शर्ट घालून आला होता. आणि आता त्याची जोरदार चर्चा देखील सोशल मीडियावर होताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी शाहरुखने फाटलेला ‘टी-शर्ट’ का घातला आहे? या विषयी सर्च करायला सुरुवात केली. मात्र याचे खरे कारण कोणालाही कळाले नाही.

शाहरुख खानने घातलेला व्हाइट रंगाचा टी-शर्ट हा फाटला होता. काखेच्या खालच्या बाजूला शाहरुख खानचा टी शर्ट फाटला असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानच्या फाटलेला टी-शर्टची चर्चा जोरदार रंगली असून, अनेकांनी लतादीदींना अंतिम निरोप देण्यासाठी शाहरुख घाईगडबडीत आला. घाईगडबडीत आपण काय घातले आहे? याच त्याला भानही राहिले नाही. लता दीदी जाण्याने इतरांप्रमाणे शाहरूख देखील आपलं भान हरपून बसल्याने हा टी-शर्ट फाटका आहे, याची त्याला जाणीव झाली नाही, असं सोशल मीडियावर काही जणांकडून बोलण्यात येत आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे खूप जवळचे संबंध होते. संपूर्ण देशाप्रमाणे शाहरुख खान हा देखील लतादीदींच्या आवाजाचा खूप मोठा चाहता होता. लता मंगेशकर यांची गाणी मी आवर्जून ऐकत असल्याचं त्याने स्वतः अनेक कार्यक्रमांमधून सांगितले आहे‌

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.