युग संपले! ‘गानकोकिळा’च्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा

0

भारताची गानकोकिळा म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले असून संपूर्ण जगवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पाठीमागच्या चार-पाच दिवसापूर्वी लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक होत असंल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र काल अचानक त्यांची प्रकृती खालावली. काल त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होते, मात्र आज सकाळी त्यांनी ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

आजवर आपल्या आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर ह्या 92 वर्षाच्या होत्या. आजही त्यांचा आवाज पूर्वीसारखाच तरुण असल्याचा ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टर ‘प्रतीत समदानी’ यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते.

ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी स्वतः लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवर दाखल केलं असल्याची माहिती काल सोशल मीडियावरून दिली. लता मंगेशकर यांची प्रकृती ठणठणीत व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी अयोध्येत आचार्य पीठाच्या तपस्वीच्या छावणीत, महायज्ञ करण्यात आला होता. महायज्ञ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी देखील या यज्ञाचे आयोजन केले होते.

कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात लता मंगेशकर ह्या अतिशय साध्या पद्धतीने वावरताना पाहायला मिळत होत्या. अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी संवाद साधताना, मी जेवणाच्या बाबतीत खूप फुडी आहे. अनेकांकडून गायकांना नेहमी काय खावे आणि काय खाऊ नये, याच्या टिप्स दिल्या जातात. मात्र विविध पदार्थ माझ्या समोर आल्यानंतर मी स्वतःला आवरू शकत नाही. आणि त्याचा मी पोट भरुन आस्वाद घेते. असं लता मंगेशकर एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या.

8 जानेवारीला लता मंगेशकर यांना कोरोणाची लागण झाली होती. आणि तेव्हापासून लता मंगेशकर ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात उपचारचा घेत होत्या. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून देवाकडे प्रार्थना केली जात होती मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. आज सकाळी त्यांनी ब्रीच कँडी’ रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.