‘या’ किरकोळ कारणामुळे सारा-कार्तिकचा झाला ब्रेकअप; कारण जाणून तुम्हीही घालाल शिव्या
सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात काय चाललंय? याविषयी जाऊन घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. हीरो-हीरोइन कोण कोणाला डेट करत आहे? कोण कोणाचा बॉयफ्रेंड आहे, याची सर्वसामान्यांमध्ये कमालीची क्यूरॅसिटी असल्याचे पाहायला मिळते. अनेक सेलिब्रिटी एकमेकांना ‘डेट’ करत असल्याचं जाणून घेणंही, आता सोशल मीडियामुळे सहज शक्य झालं आहे.
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी एकमेकांना डेट करत असले तरी, त्यांचं कधी बिनसेल, आणि ते कधी वेगळे होतील हे सांगताही येत नाही. बॉलिवूडमध्ये हा विषय नविन राहिलेला नाही. एकमेकांना डेट करत अनेकांनी आपला संसार थाटलाय, तर अनेकांची घरे देखील यामुळे उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. सलमान खान ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी त्याकाळी माध्यमांची हेडलाईन बनून राहायची. मात्र नंतर हे दोघेही वेगळं झाले. यात ऐश्वर्याने आपला संसार थाटला तर सलमान अजूनही सिंगलच आहे.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर देखील अनेक माध्यमांनी या दोघांच्या लव्ह स्टोरीचे किस्से कित्येक वर्ष सांगितल्याचे आपण सर्वांनीच ऐकले आहे. या दोघानंतर बॉलीवूडमध्ये अनेक जोडपी लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. यात्र रणबीर कपूर-दीपिका, रणबीर-कॅटरिना यांचाही समावेश होतो. पडद्यावर हिट झालेली ही जोडी, रिअल लाईफमध्ये मात्र फ्लॉप ठरली. बॉलिवूडमध्ये अनेकजण एकमेकांना डेट करतात, आणि ठराविक काळानंतर वेगळेही होतात. परंतु बऱ्याचदा ही लोकं वेगळे होण्याचे कारण मात्र गुदस्त्यातच राहतं.
सारा अली+खान आणि कार्तिक आर्यन या दोघांची रियल लाईफ प्रचंड चर्चेत राहिली. आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत असून आम्ही दोघेही कमालीचे खूष असल्याचे, अनेक वेळा या दोघांनी पब्लिक प्लॅटॉर्मवर सांगितल्याचे आपण अनेक वेळा पाहिलं असेल. रिअल लाईफ मधली ही सेक्सी जोडी अनेकांना आवडली. मात्र काही महिन्यांपूर्वी या दोघांचा ब्रेक-अप झाल्याच्या बातम्या झळकल्या. आणि अनेकांना आश्र्चर्य वाटले.
सारा आणि कार्तिक या दोघांचा ब्रेकअप का झाला? या विषयी लोकांमध्ये चर्चा रंगल्याचे पाहायला मिळू लागले. या दोघांचा ब्रेकअप होण्यापाठीमागे अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. मात्र या दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण कोणालाही माहीत पडले नाही. परंतु आता या ‘ब्रेकअप’चे खरे कारण स्वतः सारा अली खानने सांगितले आहे. या बाबत तिने मोठा खुलासा केला आहे. सारा अली खानने ब्रेकअपचे सांगितलेले कारण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटले.
एखादा फोटो मी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आणि एखाद्याला टॅग केल्यानंतर कार्तिक आर्यनला ते, आवडत नव्हते. या किरकोळ कारणावरून आमचे वाद व्हायचे, असा खुलासा सारा अली खानने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला आहे. वरून धवन आणि सारा अली खान यांचा ‘कुली नंबर वन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात आल्यानंतर ती मनमोकळ्या गप्पा मारताना हे विधान केले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम