धक्कादायक..! संतोष परब नाही ‘या’ तीन कारणांमुळे नितेश राणेंना खावी लागतेय जेलची हवा..
हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नितेश राणे हे नाव प्रचंड चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना कधीही अटक होवू शकते, असं बोललं जात असतानाच, नितेश राणे गायब झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. सुरुवातीला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नाकारल्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
या दोन्ही न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं. एकीकडे न्यायालयाने संरक्षण दिलं असलं तरी, आज ना उद्या आपल्याला अटक होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन नितेश राणे यांनी तपास अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे ठरवले. नितेश राणे यांना आता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यास सुरुवात देखील केली असल्याचं समजतं.
हिवाळी अधिवेशन दरम्यान आदित्य ठाकरे सभागृहाच्या पायऱ्या चढत असताना, सभागृहाच्या पायरीवर बसून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव असा आवाज काढल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कमालीचं तापल्याच दिसून आलं. एकीकडे शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढल्याच बोललं जाऊ लागलं.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री केलं. विरोधकांकडून राणेंना मंत्री फक्त शिवसेनेवर टिका करण्यासाठीच केलं असल्याचं, बोललं जाऊ लागलं. विरोधकांच्या या आरोपात तथ्य असल्याचे देखील दिसून आलं, त्याचं कारण म्हणजे, मंत्री झाल्यापासून नारायण राणे सतत शिवसेनेवर हल्ला करताना दिसून आले. एवढेच नाही तर त्यांनी मी मुख्यमंत्री यांच्या ‘कानशिलात’ लावली असती, असा उल्लेखही केली. यामुळे त्यांना जेवत्या ताटावरून अटकही करण्यात आली होती.
नारायण राणे यांना अटक केल्यानंतर नारायण राणे यांचे दोन्हीं पुत्र अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. हिवाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचंही पाहायला मिळाले. सभागृहाच्या पायऱ्या चढत असताना आदित्य ठाकरे यांना उद्देशून नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला. त्यांच्या या कृत्याची चर्चा सभागृहात देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
नितेश राणे यांना झालेली अटक ही राजकीय हेतू पोटी करण्यात आली असल्याचा विरोधकांकडून खासकरून भाजपकडून बोलण्यात येत आहे. नितेश राणे हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत असल्यामुळे त्यांच्यावर ही सुडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई आहे. असं एकीकडे विरोधकांकडून बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव असा आवाज काढणे, महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींवर पातळी सोडून वारंवार टीका करणं, यामुळे नितेश राणे यांच्यावर ही कारवाई झाली असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असल्या तरी, यामध्ये अनेक शंका उपस्थित होतात.
वरील दोन कारणांमुळे ही कारवाई झालेली आहे. असं गृहीत धरलं तरी, दुसरीकडे जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला कणकवलीत हल्ला झाला. हा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते यांना अटक करण्यात आली. पुढे तपासात सचिन सातपुते यांनी नितेश राणे यांचं नाव या हल्ल्यात घेतलल्याच सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं. आणि म्हणून नितेश राणे यांना अटक करण्यात आली, असल्याचं स्पष्ट होतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम