‘वाइन’ बनवण्यासाठी लागणाऱ्या ‘द्राक्षा’चे उत्पादन महाराष्ट्रात होतं का? शेतकऱ्यांच्या नावाने सरकार आपलं ‘उत्पन्न’ वाढवतय

0

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किराणा दुकान, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सरकारने महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट’ बनवून ठेवलं,असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या परीने राजकारण करत असले तरी, सरकारने घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का?

 

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, ‘किराणा दुकान’ तसेच ‘सुपर मार्केट’मध्ये वाईन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांकडून सरकारने घेतलेल्या निर्णयाचा जोरदार विरोध केला जात असून, त्याचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचे बोलले जात आहे. तर सरकारकडून “वाईन म्हणजे दारू नव्हे” दारू आणि ‘वाईन’मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. काजू आणि द्राक्ष पासून बनवण्यात येणाऱ्या वाइनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील दारू आणि वाईनमध्ये खूप फरक असल्याचे सांगण्यात आलंय. विरोधक फक्त राजकारण करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, तिथे देखील दारु लोकांना घरपोच पुरवण्याचा विचार शिवराज सिंह चौहान सरकार करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. असं अजित पवार यांनीही म्हटलं आहे.

 

एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांकडून आपापल्या परीने राजकारण होत असतं तरी, या निर्णयाचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे का? याबाबत अनेक दिग्गजांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. तर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना याचा कसलाही फायदा होणार नसल्याचं समोर आले आहे. पुर्वी महाराष्ट्रात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात होते.

 

सांगली आणि नाशिक जिल्ह्यात वीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन करणारा शेतकरी होता. मात्र पाठीमागचा वीस वर्षाचा विचार केला तर, या भागात वायनरी उत्पादनात मोजकेच द्राक्ष बागायतदार शिल्लक राहीले आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर, द्राक्ष उत्पादन घेणारे क्षेत्र हे पाच हजाराच्या जवळपास आहे. बाजारपेठेमध्ये इतर फळबागांच्या वाईन पेक्षा द्राक्षाच्या वाइनला सर्वाधिक मागणी आहे.

 

द्राक्षाच्या वाईन ला सर्वाधिक मागणी असली तरी, बाजारपेठांमध्ये विक्रीला येणारं द्राक्ष आणि ‘वाईन’ला लागणारे द्राक्ष हे पूर्णतः वेगळं आहे. बाजारपेठात येणाऱ्या द्राक्षापासून वाइन बनवली जात नाही. आणि ज्या द्राक्षापासून वाइन बनवली जाते, ती बाजारपेठेत येत नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातला शेतकरी ज्या द्राक्षांपासून वाईन बनवली जाते, त्या द्राक्षाचे उत्पादनच घेत नाही, हे समोर आले आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर, राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्याचा अजिबात हिताचा नसल्याचे स्पष्ट होत असून, सरकारने शेतकऱ्याच्या नावाने आपल्या उत्पन्नात वाढ होणार निर्णय घेतला असल्याचे पहायला मिळतय.

 

 

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.