लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत:कोरडे पाषाण; संपत्ती नावावर करून ‘नवज्योत सिंग सिद्धू’ने आईलाच काढले घराबाहेर

0

पंजाबचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू नेहमी चर्चेत असतात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सोबतचा नवज्योत सिंग सिद्धू यांचा वाद देशभर प्रचंड गाजल्याचं पहिला मिळालं होतं. अनेक कार्यक्रमात मुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच नवज्योत सिंग सिद्धू यांनी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. काँग्रेस आणि अमरिंदरसिंग यांच्यामध्ये काही मतभेद असल्याचे देखील समोर आले होते. हे मतभेद नवज्योत सिंग सिद्धूमुळेच निर्माण झाल्याचे त्या वेळी बोललं जात होतं.

पंजाबचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून आपला नावलौकिक मिळवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या सगळ्यांना वैतागत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपला नवा संसार थाटला. आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने दलित चेहरा म्हणून ओळख असणारे चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केलं.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून नवज्योत सिंग सिद्धू यांना संधी मिळणार असल्याचं बोललं गेलं. मात्र काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एक दलित चेहरा पुढं केल्याचं बोललं गेलं, आणि एकदा नवज्योत सिंग सिद्धू नावाची चर्चा झाली. क्रिकेटचं मैदान असो, कॉमेडी सर्कस असो, किंवा राजकारण असो, नवज्योत सिंग सिद्धू नावाची चर्चा नेहमी होत असते.

आता पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धू नावाची चर्चा होत आहे, मात्र यावेळी आपल्या खाजगी आयुष्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या वडिलांच्या निधनानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी सगळी संपत्ती आपल्या नावावर करत मला आणि आईला घरातून हाकलून दिल. असा गंभीर आरोप नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बहीणीने केली आहे.

सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या बहिण डॉ, सुमन तूर यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत, नवज्योत सिंग सिद्धूवर अनेक धक्कादायक आरोप लावले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांना नवज्योत सिद्धू खोटं बोललेत. त्यांनी या नेत्यांना मी दोन वर्षाचा असताना आई वडील वेगळे झाल्याचे खोटे सांगितले आहे. आमच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सगळी संपत्ती आपल्या नावावर केली. आणि आईला घरातून हाकलून दिलं. नंतर आईचं दिल्लीचा रेल्वे स्टेशनवर बेवारस निधन झाल्याची नोंद झाली. असा धक्कादायक खुलासा सिंद्धू यांची बहीण सांगणाऱ्या सुमन तूर यांनी केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.