यावर्षी कांदा मोठा का झाला नाही? कांद्याला नळ-बोंडे का आले, वाचा सविस्तर
महाराष्ट्रासह देशातल्या काही राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आढळतो. कांद्यामुळे अनेक शेतकरी लखपती झालेत, तर काही मातीमोल देखील झाल्याचे आपल्याला सर्रास अनेक भागात पाहायला मिळतं. कांदा उत्पादन करायचे म्हणजे घाव-डाव आहे, असं खेडेगावातला शेतकरी बोलताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल.
तसं पाहायला गेलं तर रब्बी हंगामातील अनेक पिकांचे उत्पादन करायचं म्हटलं तर, शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरूनच करावं लागतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारण रब्बी हंगामात शेतकऱ्यांवर निसर्ग अधिक कोपल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे थंडी तर असतेच, मात्र दुसरीकडे कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, सतत वातावरणात होणारे बदल, यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. अशा सतत वातावरणाच्या बदलामुळे फार कमी प्रमाणात उत्पन्न निघते.
अवकाळी पाऊस गारपीट सतत वातावरण बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होताना पाहायला मिळते. अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. वातावरणात सतत बदल झाल्याने शेतकऱ्यांनी अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा खूप कमी उत्पन्न निघते आणि शेतकऱ्यांचा उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज सगळ्या चुकून बसलेला असतो. अनेक संकटांचा सामना शेतकऱ्याला काळात करावा लागतो.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी तर शेतकरी पुरता हवालदिल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. यावर्षी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर हवामानाचा खूप मोठी वाईट परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सतत वातावरणात होणारे बदल अवकाळी पाऊस गारपीट गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, आणि उत्पन्न फार घटल्याचे दिसून आलं. उत्पादक शेतकऱ्यांना देखील यावर्षी खूप मोठा फटका सहन करावा लागला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा उत्पादक शेतकर्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वातावरणात होणारे बदल, अचानक कोसळणारा अवकाळी पाऊस, अचानक होणारी गारपीट, अशा अनेक संकटामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागला. खासकरून कांद्याची लागण केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले.
वातावरणात होणाऱ्या सतत बदलांमुळे शेतकऱ्यांचा कांदा यावर्षी खूप छोटा राहिल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर यावर्षी वातावरणात सतत बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला नळ-बोंडे आल्याचेही दिसून आले. दर वर्षी प्रमाणे या वर्षी कांदा मोठा झाला नसल्याने, शेतकऱ्यांनी कांदा शेतात जास्त दिवस ठेवल्याने, कांद्याला नळ बोंडे आल्याचे दिसून आले. कांदा छोटा राहील्याने अनेक कांद्याला नळ-बोंडे आल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा अंदाज यावर्षी कोलमडल्याचे,आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम