बलात्कार होत असेल आणि आपण तो रोखू शकत नसेल, तर गप्प पडून मज्जा घ्यायची! असं वादग्रस्त विधान करणारा आमदार सध्या कुठे आहे

0

अलिकडच्या काळात राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असताना पाहायला मिळतो. कोणताही पक्ष असो पक्षातील अनेक नेते एकमेकांवर टीका करताना पातळी सोडल्याचे अनेकवेळा दिसून येते. फक्त विरोधकांवर टीका करताना ही मंडळी आपली पाकळी सोडताना बोलण्याचे पाहायला मिळत नाही, तर संसदेत सभागृहात अधिवेशनात नेतेमंडळी पातळी सोडून बोलताना आपण अनेकवेळा पाहिले असेल.

गेल्या एक दीड महिन्यापूर्वी कर्नाटक विधानसभेत कॉंग्रेसच्या एका आमदाराने एक धक्कादायक विधान केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती. राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार रमेश कुमार सभापतींकडे वेळ मागत होते, परंतु आमदार म्हणाले मला वेळ देता येणार नाही. तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मला वाटतंय तुम्ही परिस्थितीचा आनंद घेत आहात. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही,तसेच त्यावर नियंत्रणही ठेवू शकत नाही,” असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

सभापतींच्या या उत्तराला आमदारांनी प्रतिउत्तर देताना कळसच गाठल्याचं पाहायला मिळाले. आमदार रमेश कुमार यांनी एका म्हणीचे उदाहरण दिले खरे, परंतु उदाहरण देताना आमदाराला आपण काय बोलतोय याचं भान देखील राहिले नाही, सभापतींच्या वक्तव्यानंतर आमदार रमेश कुमार म्हणाले, तुमच्या वक्तव्यावरून मला असं वाटतंय तुम्हाला असं म्हणायचंय कि, जेव्हा आपल्यावर बलात्कार होत असतो ,आणि आपण तो वाचवू शकत नाही, त्यावेळी गप्प पडून त्याची मजा घ्यायची असं निंदनीय वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली.

या विधानामुळे रमेश कुमार चांगलेच अडचणीत आले. विशेष म्हणजे या सभगृहाचे सभापती विश्वेश्वर हेगडे, हे देखील रमेश कुमारच्या विधानानंतर हसू लागले. या प्रकारानंतर देशभरातून टीका करण्यात आली. रमेश कुमार यांचं असं पहिल्यांदाच बोलले आहेत, असं नाही या पूर्वी देखील त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते.

या निंदनीय घटनेनंतर विरोधकांकडून रमेश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आल्यानंतर अखेर रमेश कुमार यांनी जाहीर माफी मागितली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रमेश कुमार यांनी एक उदाहरण द्यायचं प्रयत्न केला होता, मात्र त्याचा अर्थ चुकीचं निघाला. या गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. या पुढे मी शब्दाची निवड योग्य प्रकारे करेन.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.