marriage age of women : मुलींच्या लग्नाचे वय १८ ऐवजी २१ वर्ष, मंत्रिमंडळात प्रस्तावाला मंजुरी

0

मुलींच्या लग्नाचे वय (marriage age of women) १८ ऐवजी २१ करावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती.आता मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय  (marriage age of women) १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली असल्याचे वृत्त हाती लागले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच कायद्यामध्ये दुरुस्ती होणार आहे.

 

देशातील मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचा विवाह योग्य वेळी होणे गरजेचे आहे, असे नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात म्हणाले होते. सध्या कायद्यात लग्नासाठी पुरुषांचे किमान वय २१ आणि महिलांचे १८ वर्षे असणे बंधनकारक आहे. मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

नीती आयोगात जया जेटली यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या टास्क फोर्सकडून ही शिफारस करण्यात आली होती. व्ही. के. पॉल हे देखील या टास्क फोर्सचे सदस्य होते. या टास्क फॉर्समध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि साक्षरता अभियान आणि न्याय आणि कायदा मंत्रालयाचे विधेयक विभाग सदस्य होते.

 

जून 2020 मध्ये या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती आणि या टास्क फोर्सने डिसेंबर 2020 मध्ये त्याचा अहवाल सादर केला होता. पहिल्या मुलाला जन्म देतेवेळी महिलेचे वय हे किमान २१ वर्षे असावे. लग्न उशीरा केल्याने कुटुंब, महिला, मुले आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होतो, असे टास्क फोर्सने त्यांच्या अहवालात म्हटले होते.

हेही वाचा: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.. 

जिल्ह्यातील 55 गावच्या सरपंचांचे सरपंचपद जाणार? सीईओंच्या नोटीशीने खळबळ 

पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.