महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..

0

गेल्या बऱ्याच वर्षापासून राज्यात चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी नुकतीच सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आज गुरुवारी सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता सुप्रीम कोर्टाकडून राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे

 

याअगोदर मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडा मालक आणि शर्यत प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. याअगोदर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात २०१७ मध्ये एक कायदा संमत करण्यात आला होता.

 

“अनेक सरकारे आली आणि गेली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी असल्यामुळे, न्यायालयात हे प्रकरण असल्याने शेतकऱ्यांना नाराजी पत्करावी लागत होती. बऱ्याचदा शेतकऱ्यांनी शर्यती घ्यायचा प्रयत्न केला आहे. परंतु महाविकास आघाडीने परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही पुन्हा एकत्र बसलो, चांगले वकील उभे केले आणि कोर्टात बाजू मांडली गेली. असे अजित पवार म्हणाले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, बऱ्याच जणांनी बैलगाडा शर्यतीचे व राजकारण केले, मत मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागाच्या दृष्टीसाठी हा महत्त्वाचा विषय आहे,” अशी प्रतिक्रिया न्यायालयाच्या निकालानंतर अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

 

देशातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ या राज्यांत आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्र राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याचदा यावरून राजकारण झाले. आरोप प्रत्यारोप झाले. पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला शासनाने मान्यता दिल्याने बैलगाडा चालक मालक वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: जिल्ह्यातील 55 गावच्या सरपंचांचे सरपंचपद जाणार? सीईओंच्या नोटीशीने खळबळ 

मोठी बातमी! रुपाली पाटील ठोंबरे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश, मिळणार ही मोठी जबाबदारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.