धक्कादायक..! विराट कोहली ‘शमी’च्या खंबीरपणे पाठीशी उभा राहीला तेव्हाच त्याची कर्णधार पदावरुन हकालपट्टी करायचं ठरलं होतं

0

विराट कोहली‌च्या कर्णधार पदावरून सध्या भारतीय क्रिकेटचं वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. एवढा मोठा निर्णय प्रेस कॉन्फरन्स न घेता अवघे दोन ओळींचे ट्वीट करत वन डे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून विराट कोहलीची एकीकडे हाकलपट्टी करत असल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं. आणि दुसरीकडे ट्विटरवर सेम-अॉन बिसीसीआय हा हॅशटॅग ट्रेंड झाला‌. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीला सातत्याने लक्ष केल्याचं पाहायला मिळत होतं. खासकरून ‘वर्ल्ड टेस्ट’ चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहलीवर अनेकांनी टीकेची झोड उडवली. मात्र आता सर्व स्तरातून बीसीसीआयला लक्ष केल्याचं दिसून येत आहे.

विराट कोहलीने t20 संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा स्वता:हून दिला असला तरी, सर्व स्तरातून दबाव आल्यानंतर विराट कोहलीने असा निर्णय घेतला, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. दुबईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने आपण टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचं, विश्वचषकापूर्वीच जाहीर केलं होतं. टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघ साखळीतच गारद झाल्याने रोहित शर्माला व्हाईट बॉल क्रिकेटचा कर्णधार करण्यात यावं, या बातम्यांनी जोर धरला. बीसीसीआयने देखील व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असावा, अशी आमची इच्छा असल्याचं जाहीर केलं,असल्याचं बोललं जाऊ लागलं.

आणि अखेर दोन दिवसापूर्वी आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून व्हाईट बॉल क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार असल्याचं, एक ट्वीट करत बीसीसीआयने जाहीर केलं. इकडे रोहित शर्माला कर्णधार म्हणून निवडण्यात आलं, मात्र दुसरीकडे विराट कोहलीने केलेल्या कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याचे धन्यवाद देखील मानले नसल्याने बीसीसीआयवर टिकेची झोड उठली. आणि अखेर चोवीस तासानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला थँक्यू म्हणत, धन्यवाद मानले. तोपर्यंत ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांनी Same On BCCI हा हॅशटॅग ट्रेंडही केला.

विराट कोहलीची कर्णधार पदावरून हकालपट्टी केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सेम ऑन म्हणत, बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. मात्र दुसरीकडे या प्रकरणात राजकारणी मंडळींनी देखील उडी घेतली. उद्धव ठाकरे सरकार मधील ऊर्जा मंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यात अमित शहा यांच्या मुलाचाच हात असल्याचं म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

दुबई मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा दारुण पराभव केला. भारतीय गोलंदाजांना पाकिस्तान संघाच्या एकाही फलंदाजाला बाद करण्यात यश आले नाही. भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत ट्रोल केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणानंतर अनेक भारतीय दिग्गजांनी आणि काही नेत्यांनी देखील मोहम्मद शमीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली देखील होता.

मोहम्मद शमीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील्यानेच बीसीसीआयने विराट कोहलीची कर्णधार पदावरून हकालपट्टी केल्याचा गंभीर आरोप नितीन राऊत यांनी बीसीसीआय आणि अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करत नितीन राऊत म्हणाले, पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर, ज्या खंबीरपणे विराट कोहली मोहम्मद शमीच्या पाठीशी उभा राहिला, तेव्हाच विराट कोहलीचे कर्णधारपद जाणार असल्याचा अंदाज यायला हवा होता. कारण बीसीसीआयमध्ये सध्या ‘शाह’जादे राज्य करतात. असा गंभीर आरोप बीसीसीआयचे सचिव अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर नितीन राऊत यांनी केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.