अमित शहांच्या वाढदिवसाला त्यांना कोणीतरी शर्ट आणि पँट पिस गिफ्ट करा, कालपासून ते एकच ड्रेस घालतायेत

0

काल चंद्रकांत पाटील व अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक अढावा देण्यासाठी आपण अमित शहा यांची भेट घेतली असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. राज्यातील साखर उद्योगातील महत्वाच्या बाबींवर शहा व चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाल्याचे भाजपा कार्यालयाने सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर विचारले असता ते म्हणाले, मी आणि चंद्रकांत पाटील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामासाठी या ठिकाणी आलो आहे. संघटनेची पुढील वाटचाल आणि आढावा यासाठी बैठक आयोजित केली होती असे देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले.

आम्ही ४ ते ५ तास त्याच बैठकीमध्ये होतो. त्यापेक्षा वेगळ्या कुठल्याही कारणासाठी आमची बैठक नव्हती. संघटनात्मक बदलाविषयी विचारल्यानंतर ते म्हणाले कुठलाही संघटनात्मक बदल नाही. नागपूर मध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या मतांनी निवडून येतील असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काल चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवेळी आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवेळी अमित शहा यांनी एकच कपडे परिधान केलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच रोहन रिप्लायज या ट्विटर वापरकर्त्यांनी
“अमित शहांच्या वाढदिवसाला त्यांना कोणीतरी शर्ट आणि पॅंट पिस गिफ्ट करा. कालपासून तो एकंच ड्रेस घालायलेत” अशी प्रतिक्रिया प्रशांत कदम यांच्या ट्विटला दिली आहे.

दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये महानगरपालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मुंबई महानगरपालिका, पुणे महानगपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरोधात कसा डाव आखायचा याची चर्चा दिल्लीत झाल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: २०२४ला शिवसेना भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट; शरद पवारांची खेळी त्यांच्याच अंगलट 

संप मागे नाहीच! एसटी चालवायची असेल तर शरद पवारांनी ड्रायव्हर,अनिल परबांनी घंटी वाजवायची,अजित पवारांनी प्रवासी व्हायचं.. 

मनसैनिकांनो तुमच्यासाठी गोड बातमी, रुपाली ठोंबरे पक्ष सोडणार नाहीत म्हणाल्या; मनसे तर.. 

नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा क्रांती रेडकरला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.