Pimpri Chinchwad: राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवारांनी फिरवली पाठ; राजकीय चर्चेला उधाण

0

पिंपरी चिंचवड| महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या  उपस्थितीत मेळावा होत आहे. या मेळाव्याला मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले आले नाहीत. आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवारांसह त्यांचा मुलगा पार्थ पवार देखील या मेळाव्याला आले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. मात्र पक्षाचे मोठे नेते व त्याचे पुत्र दोघांनीही या कार्यक्रमाला पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. या मेळाव्याला पुण्यातील राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते व ठाकरे सरकारमध्ये नुकतीच गृहमंत्री पदाची जबाबदारी मिळालेले दिलीप वळसे पाटील हे देखील मेळाव्याला हजर होते.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचे पुत्र पार्थ हे दोघे गैरहजर होते. अजितदादा आणि पार्थ पवार गैरहजर असल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांचे जुने कार्यकर्ते व सहकारी कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होते. विशेषबाब म्हणजे शरद पवार हे  2004 सालापासून तब्बल 17 वर्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणापासून दूर होते.

आगामी महानगरपालिका निवडणूकीची राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसापासून पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत.  पिंपरी-चिंचवडमध्ये  काल झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

पिंपरी-चिंचवडमध्ये काल झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी मी जेव्हा २००४ ला शेती खात्याचा मंत्री होतो तेव्हा, माझ्याकडे एक फाईल आली होती. देशात फक्त चारच दिवस पुरेल इतका अन्न साठा शिल्लक होता. परदेशातून अन्य पुरवठा आयात करण्याची ती फाईल होती.

मात्र मी त्या फाइलवर सही करण्यास इच्छुक नव्हतो.
नाईलाजाने मला त्या फाईलवर सही करावी लागली. आम्ही यावर काम करायचं ठरवलं. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी गहू,साखर,तांदूळ उत्पादनात प्रचंड भरारी घेतली. आणि गहू,तांदूळ,साखर उत्पादनात भारत जगात सर्वात जास्त उत्पन्न काढणारा देश ठरला, असे शरद पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे पक्ष मेळाव्यात बोलत होते.

याअगोदर शरद पवार हे पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाचा घटक असलेल्या पिंपरी-चिंचवड भागाचे लोकसभेचे प्रतिनिधित्व करत होते. परंतु पिंपरी चिंचवडच्या काही जुन्या मंडळींचा संपर्क वगळता त्यांनी स्थानिक राजकारणामध्ये कधीही लक्ष घातलेलं नाही. पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी नेहमीच अजित पवार सांभाळताना पाहायला मिळत होते.

मात्र तब्बल 17 वर्षांनी शरद पवार पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत.
2016 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राजकारणात पाऊल टाकले होते.

पार्थ पवारांना मावळ लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते परंतु त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राज्यात सरकार येऊन देखील पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची मरगळ काही केल्या संपत नव्हती.

महानगरपालिका निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आल्या आहेत. परंतु तरीसुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्तांतर होईलच, असं कुणी खात्रीने सांगू शकत नाही, स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रवादीमध्ये तसा कुठलाही जोर दिसत नाही. गटबाजीने पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा रुळावर आणा असे विनंती स्थानिक जुन्या मंडळींनी शरद पवार यांच्याकडे गेले आणि मग शरद पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतला.

शरद पवार यांनी अनेक कार्यकर्त्यांना पक्षातील स्थानिक नेत्यांना भेटीगाठीसाठी बोलावलं मात्र या सगळ्या दरम्यान अजित पवार आणि अलीकडच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणारे पार्थ पवार हे दोघेही सध्या सक्रिय पाहायला मिळत नाहीत. 2016 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये पार्थ पवारांचा पराभव झाला. या दोन्ही वेळा अजित पवारांचा एक्का चालला नाही.

हेही वाचा –शरद पवार सोनिया गांधी उद्धव ठाकरेंची कराळे मास्तरने का केली आरती? कारण जाणून जाल चक्रावून 

अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.